डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचेे शेवटचे शब्द

बघा हे वाचून तरी सगळयांचे डोळे उघडतील अशी अपेक्षा करतो.
लोकदर्शन👉संकलन
बाबासाहेब म्हणाले-:

मी माझ्या संपूर्ण आयुष्यात लढलो, तो फक्त तुमच्यासाठी.तुम्ही सुखात रहावं म्हणून.
यासाठी मी माझ्या संसाराकडे लक्ष दिले नाही.
मी नामवंत विद्यापिठाच्या पदव्या घेऊन आलो.
M.A., PH.D., M.SC., D.SC., L.L.B.
तेव्हा मला मुंबईच्या हायकोर्टाच्या न्यायाधीशाची नोकरी सरकार देत होतं, पण मी ती नाकारली. का? कारण मला फक्त तुम्हाला न्याय मिळवून द्यायचं होतं.
मी सुद्धा एक मंत्री बनून आरामात आयुष्य जगलो असतो, पण नाही.
माझा जन्म झाला होता आराम न करण्यासाठी.तो मी तुमचेकरिताअगदी खुशीने स्विकार केला.
मी तुमच्यासाठी गोलमेज परिषदेत भांडलो.
महार , मांग , चांभार , सुतार, लोहार, माळी, धनगर, कुणबी, कोळी व अन्य माझ्या सर्व मागासवर्गीय ,शोषित,पिडीत,दलित वंचित व माझ्या अस्पृश्य बांधवांसाठी मी आयुष्यभर अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढलो.त्याकरिता मी माझ्या कुटुंबाचा व सर्वस्वाचा सर्व त्याग केला, सर्व हालअपेष्टा सोसल्या,अगदी हलाखीचे कष्टमय जीवन जगलो.आयुष्यभर जीवापाड मेहनत घेतली,प्रसंगी तुम्हाला न्याय मिळवून देण्याकरीता अक्षरक्षः भांडलोदेखिल
मी हिंदु धर्माचा त्याग केला आणि बौद्ध धर्म स्विकारला.
पण मी माझ्या हिंदु माता-भगिनींसाठी “हिंदु कोड बिल” बनवलं.त्यात मी स्त्रीयांसाठी घटस्फोटाचा अधिकार , वडीलांच्या संपत्तीमध्ये मुलीला समान अधिकार दिले.कामगारांकरीता कल्याणकारी कामगार कायदे बनविले.
मी तुम्हाला एवढं सगळं दिलं.मी संविधानात SC, ST,OBC, NT यांना आरक्षण दिलं,हक्क आणी सर्व संम्पूर्ण अधिकार दिलेत.सर्वांना मतदानाचा समान अधिकार दिला.सरकारला खुर्चीवर बसविण्याचा व प्रसंगी खुर्चीवरून खाली खेचण्याचा अतिशय ताकदवान व ऐतिहासिक असा अधिकार दिला.
पण बांधवांनो तुम्ही मला काय दिलंत??? तुम्हाला जर मला काय द्यायचं असेल तर एक काम करा. हे
सर्व माझ्या 85 टक्के दलित, पिडीत सोशित व वंचित बहुजनांनो एक व्हा,नेक व्हा.तुम्ही आता आप आपसात न लढता व
तुम्ही सर्वांनी एकत्र येवून आपल्या मागण्या,हक्क,अधिकार व कल्याणाकरीता संघर्ष करा.आता रडत न बसता,लढायला शिका…
कारण तुम्ही जर एकत्र आलात तरच तुम्ही पुढील येणाऱ्या संकटांशी सामना करू शकाल.
एकत्र या
शिक्षण घ्या,संघटित व्हा व संघर्ष करा. आपले हक्क व अधिकार मागण्यांद्वारे मिळत नसतील तर प्रसंगी ते सर्व हक्क व अधिकार संवैधानिक मार्गांनी हिसकावून हस्तगत करून घ्या…व प्रस्थापितांचे सर्व कुटील व अनैतिक मनसुबे उध्वस्त करा..राजकीय सत्ता हस्तगत करा..स्वतःचा विकास स्वतःच करा,विकासाच्या प्रभावी योजना व त्यांची यशस्वी अंमलबजावणी स्वतःच करा.
राजसत्तेचे सारे सूत्र व नियंत्रण आपल्या स्वतःच्या हातात ठेवा.मला तुमच्या बहुजनांना प्रधानमंत्री राष्ट्रपती,मुख्यमंत्री,कलेक्टर ,मंत्री व सर्वकाही, झालेले बघायचे आहे.सत्तेचा उपयोग समाजामध्ये खरी समता,मानवता,व सर्वांसोबत सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठीच करा..समाजातील कोणताही अगदी शेवटचा घटक हा विकास व सामाजिक न्याय ,समता ,बंधुता व सामाजिक न्याय व विकासापासून वंचित राहता कामा नये अशी प्रभावी योजना तयार करून तीची प्रभावी व यश्स्वी अंमलबजावणी करून समाजामध्ये खरी समता प्रस्थापित करा….राष्टीय ऐकता व अखंडता कोणताही तडा न जाता एकमेकांबद्दल सामाजिक एकता,विश्वास व सामंजस्य प्रस्थापित करा.सामाजिक न्याय व सामाजिक समतेचे नवे व प्रभावी मापदंड प्रस्थापित करा…
हा msg जास्तीत जास्त शेयर करा ही आपणांस नम्र विनंती करतो

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *