डॉक्टरी पेशातील ‘देवमाणूस

लोकदर्शन ÷
‘देवमाणूस’ ते अगदी रुग्णांची लुटमार करणारे डॉक्टर, अशी डॉक्टरांची विविध रूपे ऐकण्यात, वाचनात येतात. त्यामुळे ‘डॉक्टरी’ हाही एक पेशाच झालेला सर्रास पाहायला मिळतो. आधीच्या काळात गावांमध्ये तर त्या काळात वैद्याकडून जडीबुटी घेतली की, आपण बरे होणार असा एक भाबडा समज प्रचलित होता. त्यामुळे गावात डॉक्टरचे महती कळायला बराचसा काळ लोटला. म्हणूनच मग शहरातील डॉक्टर नेहमीच ‘ऑन डिमांड.’ मग ते मागतील तेवढे तपासणी शुल्क त्यांना दिले जायचे. तेव्हा थोडी माणुसकी तरी होती, पण आता असेही डॉक्टर आपल्याला दिसतात, जे फक्त पैशासाठी रुग्णांच्या जीवाशी खेळायलाही मागे-पुढे पाहात नाही. आता जगभरात कोरोना विषाणूने कहर केला आहे. मोठ्या प्रमाणात रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. एका कुटुंबातील अनेक सदस्य हे कोरोनावर उपचार घेत आहे. सर्वसामान्य कुटुंबांच आर्थिक कंबरडं मोडलं आहे. खासगी रुग्णालयात कोरोना बाधितांच्या उपचार केल्यास एक लाखाच्या वर उपचार खर्च आकारण्यात येतो. पैसे गोळा करण्याकरिता आयुष्याची जमा पुंजी उपचारादरम्यान लागत असते. यातच अनेक डॉक्टर तर वारेमाप पैसे आकारात आहेत. त्यातच याला अपवाद ठरले आहेत. चंद्रपुरातील एक डॉक्टर त्यांनी चक्क उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना अनामत म्हणून घेतलेली रक्कम व आलेले बिलाचे पैसे परत करत डॉक्टरी पेशातील देवमाणुसाचे दर्शन दिले आहे.
चंद्रपूर हे महाराष्ट्रातील शेवटचे टोक आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी व कामगार वर्ग येथे वास्तव्यास आहे. कोरोना काळात मिळेल तिथे आपल्या नातलगांवर उपचार करणे सुरु आहे. येथे शेजारी असलेल्या गडचिरोली येथील दुर्गम भागातील नागरिक देखील उपचार घेत आहे. परंतु या कोरोनाच्या संकटात खासगी डॉक्टर वारेमाप शुल्क आकारात आहे. प्रशासनाने अशा डॉक्टरांवर कारवाई देखील केली. परंतु या संकट काळात अशा प्रकारे सामान्य कुटुंबाची होणारी आर्थिक लूट हे कोरोनाच्या संकटात आणखी संकट असे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यात देखील चंद्रपुरातील अनेक संकटात डॉक्टरी पेशाच्या आव न आणणारे डॉक्टर अशी डॉ. चेतन खुटेमाटे यांची ओळख आहे. दोन दिवस आधी देखील त्याच्या रूपाने डॉक्टर माणसाचे दर्शन झाले आहे. त्यांच्या गुरुदृष्टी नेत्र रुग्णालय चंद्रपूर येथे कोविड हॉस्पिटल सुरु करण्यात आले. येथे उपचाराकरिता छोटा नागपूर गावचे ग्रामपंचायत येथील शिपाई लहू बोडे यांचे कोरोना आजाराने दुःखद निधन झाले. डॉक्टर खुटेमाटे यांनी सामाजिक बांधिलकी जपत संपूर्ण फी आणि डिपॉजिट केलेली रक्कम सुद्धा परत केली. आता चंद्रपूर मधील बाकी डॉक्टरांनी यांच्या कडून काही तरी आर्दश घ्यावा .. जेणेकरून ज्या डॉक्टरातील माणुसकी संपली आहे. अशा डॉक्टरांच्या तोंडावर मारलेली हि चपराक आहेत.

मी आपल्याला मागील एक दशकापासून ओळखतो. नेहमी मला मोठ्या भावा सारखे आधारवड तुम्ही माझा सोबत आहात. हि बाब माझ्यासाठी गौरवास्पद आहे. पुढे देखील आपल्या हातून असेच कार्य घडत राहो हीच सदिच्छा…..

*आपला*

*गोविल मेहरकुरे*
*मोबा.* *9689988282*

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *