कन्हाळगाव येथे अंगणवाडी क्रं 2 येथे बेटी बचाओ बेटी पढ़ाओ पोषण अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न

By shivaji selokar

कन्हाळगाव येथील अंगणवाडी क्रमांक दोन मध्ये बेटी बचाव बेटी पढाव पोषण अभियान अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा उपसरपंच कन्हाळगाव प्रमुख पाहुणे श्री दिवाकर मालेकर,राजु वाबिटकर,सौ मंदाताई टेकाम अंगणवाडी शिक्षिका, श्रीमती अल्काबाई वाबिटकर,सौ रेखाताई आमणे आदी मान्यवर उपस्थित होते रांगोळी काढून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व विविध भाज्याचे प्रदर्शन मांडण्यात आले श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या मनोगतात बेटी बचाव बेटी पढाव या बद्दल माहिती दिली तसेच पालेभाज्या मेथीची भाजी, शेवंग्याची भाजी,माठेची भाजी,राजगीरा,मेथिची भाजी, चळवळीची भाजी तसेच इतर पालेभाज्या विषयी महिलांना व गरोदर मातांना पोषक असुन त्या पासुन गरोदर मातेला व इतर महिलांना जीवनसत्त्वे मिळून बाळाची वाढ होण्यास मदत होते महिलांनी पालेभाज्याचा जास्तीत जास्त उपयोग करावा त्यापासून शरीराला अनेक फायदे होतात याबद्दल सुद्धा सविस्तर मार्गदर्शन केले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे संचालन मंदाताई टेकाम यांनी केले तर आभार राजू वाभिटकर यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here