मच्छिमाराला सापडला २० लाखांचा निळा झिंगा; म्हणाला “लाखात एक, या झिंग्याला मी….”

स्कॉटलंडमध्ये एका मच्छिमाऱ्याला मासेमारी करताना दुर्मिळ निळ्या रंगाचा झिंगा सापडला. या झिंग्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा झिंगा चक्क चमकदार निळाशार रंगाचा असून याची किंमत जवळपास २० लाखांच्या आसपास आहे. असा दुर्मिळ झिंगा सापडल्याने मच्छिमार सध्या खूपच खूश आहे. त्याने या दुर्मिळ झिंग्याचा फोटो फेसबूकवर शेअर केला. त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

स्कॉटलंडमधील ४७ वर्षीय मच्छीमार रिकी ग्रीनहोवे हे मासेमारी करत असताना त्यांच्या गळाला हा दुर्मिळ झिंगा लागला. सुमारे 3lb इतक्या वजनाचा निळ्या रंगाचा हा दुर्मिळ झिंगा गळाला लागलेला पाहून रिकी आश्चर्य झाले. कारण, माशांच्या शोधात असताना त्यांनी हा एक दुर्मिळ निळा झिंगा शोधला. काही जनुकीय कारणांमुळे या दुर्मिळ झिंग्यामध्ये एक विशिष्ट प्रोटिनचा अभाव निर्माण होतो आणि त्याला असा निळा रंग मिळतो. त्यामुळे अर्थातच हा झिंगा दुर्मीळ म्हणजे लाखांमध्ये एखादाच असतो. म्हणूनच ‘लाखात एक’ अशी कॅप्शन देत मच्छिमाराने या दुर्मिळ झिंग्याचा फोटो फेसबूकवर शेअर केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here