गणेशोत्सवात कडक निर्बंध? विजय वडेट्टीवारांनी दिली महत्त्वाची माहिती

राज्यावरील करोना संकट अद्यापही पूर्ण टळलेलं नसून निर्बंध शिथील केले असले तरीही नियमांचं उल्लंघन करु नका असं वारंवार आवाहन केलं जात आहे. दरम्यान गणेशोत्सवावरही करोना संकट असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच आपत्ती व्यवस्थापनासंबंधी बैठक घेतली. पुढील एक ते दोन दिवसांत गणेशोत्सवासंबंधी नियमावली जाहीर केली जाणार असल्याची माहिती बैठकीत सहभागी झालेले राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

सरकार कोणत्याही सणांविरोधात नव्हे तर करोनाच्या विरोधात – मुख्यमंत्री
“लोकांनी नियमांचं पालन केलं नाही तर रुग्णसंख्या आणि करोना संकट पुन्हा एकदा वाढू शकतं. अशा पार्श्वभूमीवर काही उचित निर्णय घ्यावे लागतील अशी चर्चा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. आज उद्या तज्ज्ञांशी चर्चा करुन एक दोन दिवसात मुख्यमंत्री नियमावली जाहीर करतील,” असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

जगभरातील गणेशभक्तांसाठी मोठी बातमी! मुंबई पोलीस आणि गणेश मंडळांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

दरम्यान यावेळी विजय वडेट्टीवार यांना नाईट कर्फ्यूबाबत विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, नाईट कर्फ्यूबाबत कोणतीही चर्चा किंवा निर्णय झालेला नाही. तसंच नाईट कर्फ्यू लावण्याचा राज्य सरकारचा कोणताही विचार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

जनतेचे आरोग्य महत्वाचे, उत्सव नंतरही साजरे करू – उद्धव ठाकरे
“करोना संसर्गात थोडीशी वाढ दिसत असून मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, मी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो की, त्यांनी गर्दी  होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करावेत. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकता,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *