लोकदर्शन 👉 मोहन भारती
औरंगाबाद,÷ ,मला पत्रकारांच्या प्रश्नांची जाणीव आहे.पत्रकार हा लोकशाहीचा मजबूत पाया आहे.केंद्र शासनाच्या वतीने पत्रकारांसाठी अनेक कल्याणकारी योजना आहेत या योजनेचा लाभ पत्रकारांनी घेतला पाहिजे.आणि ज्या काही ज्वलंत समस्या पत्रकारांच्या असतील त्या मी सोडण्याचा प्रयत्न करीन.70 वर्षा नंतर औरंगाबाद शहराला कराड साहेबांच्या रूपातून केंद्रीय मंत्री पद मिळाले आहे.ही अभिमानास्पद बाब आहे.म्हणून मा.ना.श्री.डॉ.भागवत कराड साहेबांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशनच्या* वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या या वेळी ते बोलत होते पुढे बोलतांना ते म्हणाले की पत्रकार हा लोकशाहीचा महत्त्वाचा घटक तर आहेच परंतु तो समाजाचा आरसा देखील आहे.केंद्र शासना कडून मला पत्रकारांच्या कल्याणासाठी जे काय करता येईल ते मी करिन आज दिनांक २७ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी 7:00 वाजता संघटनेचे संस्थापक श्री.रतनकुमार साळवे यांच्या नेतृत्वात सुभेदारी विश्रामगृह औरंगाबाद येथे सदिच्छा भेट घेण्यात आली होती.या वेळी रतनकुमार साळवे,गणेश पवार, संजय सोनखेडे,बबनराव सोनवणे,गजानन इंगळे,रवि बनकर,सुनिल निकाळजे, फिरोजखान अादींची उपस्थिती होती.