आमदार सुभाष धोटे यांची तारसा खुर्द येथे भेट : आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचे यंत्रणेला दिले निर्देश.

लोकदर्शन 👉मोहन भारती


गोंडपिपरी :– तालुक्यातील मौजा तारसा (खुर्द) येथे डेंगू सदृश्य ताप व साथीच्या रोगाने थैमान घातल्याने गावातील लोक आजारी पडत आहेत. एवढेच नाहीतर डेंगू तापाने दोन बळी गेले अशी माहिती आमदार सुभाष धोटे यांना कळताच त्यांनी तारसा खुर्द येथे भेट देऊन एकूणच परिस्थितीची पाहणी केली तसेच ग्रामपंचायत तारसा खुर्द येथे बैठक घेऊन संबंधित पदाधिकाऱ्यांना नागरिक सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन उपाययोजना करण्यासंदर्भात सुचना केल्या. तर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन येथे आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी निर्देश दिले. या प्रसंगी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच येथे परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात आणण्यासाठी पुर्ण प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगीतले.
या प्रसंगी तहसीलदार के. डी. मेश्राम, गटविकास अधिकारी साहेबराव बुलकुंडे, कृ.उ.बा.स संचालक संभूजी येलेकर, सरपंच अजय भोयर, उपसरपंच माधुरी येलेकर, ग्रा. प. सदस्य ममता चौधरी, संध्या वासेकर, विभा चांदेकर, आशा चंदे, शरद चोचले, राकेश अलोने, निकेश बोरकुटे, नितीन धानोरकर, पंढरी आनंदराव कोडपत्तुलवार यासह स्थानिक नागरिक उपास्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *