राजुरा युवक कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदी रामेश्वर ढवस यांची निवड

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे यांना अभिप्रेत असलेली पक्ष संघटना बांधण्यासाठी पक्षश्रेष्ठीच्या संमतीने चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण) युवक काँग्रेस कमिटी तर्फे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी रामेश्वर रामरतन ढवस यांची राजुरा युवक कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदी नियुक्ती करून नियुक्तीपत्र प्रदान केले. एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या या निवडीबद्दल आमदार सुभाष धोटे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, तालुका काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष गटलेवार, कार्याध्यक्ष ऐजाज अहमद, यु. काँ चे अशोक राव, जिल्हा महासचिव प्रणय लांडे, आकाश माऊलीकर, यु. काँ चे तनय लांडे, यश मोरे, उद्देश लांडे, पियुष राखुंडे, प्रतिक कावळे, आकाश लांडे, नीरज मंडल यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले व पूढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here