विशाल पाटेकर रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 27 नोव्हेंबर 2022सामाजिक सेवेत अग्रेसर असणारे तसेच सर्वांना सोबत घेऊन चालणारे राजकारण पेक्षा समाजकारण याला महत्व देणारे , व गेली 8 वर्ष नावाजलेली संस्था मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान मार्फत अनेक उपक्रम राबविणारे आणि समाजसेवाचा वसा घेऊन पुढे चालणारे सामाजिक कार्यकर्ते विशाल विजय पाटेकर यांना ग्लोबल स्कॉलस फॉउंडेशन तर्फे रायगड भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .

ग्लोबल स्कॉलस फाऊंडेशन आयोजित सन्मान जिल्ह्याचा सन्मान कर्तृत्वाचा अंतर्गत
सदर कार्यक्रम शनिवार दिनांक 26/11/2022 रोजी सायंकाळी 6 वाजता पुणे येथील अण्णा भाऊ साठे सभागृह पुणे येथे संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री पोपटराव पवार , डॉक्टर संजीव माने {महाराष्ट्र कृषी भूषण } , प्रज्ञा पाटील – गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड योगा / योगगुरू यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

पद्मश्री पोपटराव पवार यांच्या शुभ हस्ते “रायगड भूषण पुरस्कार” – मी उरणकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विशाल विजय पाटेकर यांना (सामाजिक कार्यकर्ता श्रेणी) प्राप्त झाल्याबद्दल विविध क्षेत्रातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावरही पाटेकर कुटुंब, मित्र परिवार, चाहते यांनी विशाल पाटेकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. उरण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार महेश बालदी आणि माजी नगराध्यक्ष रवीशेठ भोईर यांनी ही शुभेच्छा देत विशाल पाटेकर यांचे कौतुक केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here