बंकटस्वामी विद्यालयाची निसर्गसहल संपन्न.*

लोकदर्शन 👉 राहुल खरात

खडकीघाट-येथील बंकटस्वामी विद्यालय या शाळेची आज दिनांक 22/11/2022 मंगळवार रोजी या शैक्षणिक वर्षातील निसर्ग सहल खडकी घाट येथील तलाव परिसरात गेली होती या सहलीमध्ये वर्ग पाचवी ते दहावी चे सर्वच विद्यार्थी सहभागी झालते. शाळेतील मुख्याध्यापक संजय सावंत सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. शाळेपासून 2 किलोमीटर सर्व मुले चालत नेण्यात आले मनमोराद निसर्गाचा आस्वाद घेतला. तलावाच्या बाजूला सांडव्याच्या खाली निसर्गाच्या सानिध्यात वनभोजनाचा आस्वाद घेतला तलावाच्या पाण्याजवळ विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपले फोटो काढले तसेच जेवण झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये ठराविक विद्यार्थी विद्यार्थिनींनी गाणी म्हटली व नक्कलाही सादर केल्या. नंतर पुन्हा शाळेच्या दिशेने प्रवास पायीच करण्यात आला. शाळेतून सर्व विद्यार्थ्यांचे पुन्हा विसर्जन करण्यात आले अशाप्रकारे एकदिवसीय निसर्ग सहलीचा आस्वाद सर्वांनी घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here