*वने, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार गुजरात दौऱ्यावर* *राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह जाहीर सभेला उपस्थिती*

 

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर

*सुरत* : राज्याचे वने, सांस्कृतिक आणि मत्स्य व्यवसाय मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर रवाना झाले असून तेथील विधानसभा निवडणूक प्रचारात ते सहभागी होणार आहेत.
श्री सुधीर मुनगंटीवार शुक्रवारी पहाटे मुंबई सेंट्रल येथून वंदे भारत एक्सप्रेस ने सुरत कडे निघाले. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री जे पी नड्डा यांच्या नवसारी येथील बी आर फार्म येथे आयोजित जाहीर सभेत श्री मुनगंटीवार उपस्थित राहणार असून त्यानंतर नवसारी विधानसभा मतदार संघात मतदारांशी संपर्क साधतील.
दरम्यान तेथील भाजपा पदाधिकारी , बूथ प्रमुख, विविध आघाड्या प्रमुख, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या बैठकाना उपस्थित राहून मार्गदर्शन करतील .या दौऱ्यात विविध जनसंपर्क यात्रामध्ये देखील सहभागी होतील.

गुजरात भाजपा चे प्रदेश अध्यक्ष श्री सी आर पाटील यांच्यासह प्रदेश पदाधिकारी श्री मुनगंटीवार यांच्या सोबत सभेला उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here