मोफत नेत्र चिकित्सा, मोतीबींदू शस्त्रक्रिया शिबिराला उत्तम प्रतिसाद.

 

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

 

उरण दि 6 नोव्हेंबर २०२२नवतरुण मित्र मंडळ पाणजे व नायर सुपर स्पेशालिटी आय हॉस्पीटल आणि नवदृष्टी सेवा संस्था नविन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि 06 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत प्राथमिक शाळा पाणजे उरण येथे मोफत नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि अल्पदरात चष्मे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते . सदर कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य विजय राजाराम भोईर यांच्या हस्ते झाले.पालवी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष परशुराम भोईर,पाणजे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष लखपती पाटील, ग्रामसुधारणा मंडळ पाणजेचे अध्यक्ष हेमंत पाटील, ग्रामपंचायत सदस्य विलास भोईर, ग्रामपंचायत सदस्य ललिता पाटील, प्रभाकर पाटील, पाणजे गावचे पोलीस पाटील – कैलास पाटील,अखिल कराडी समाजाचे सचिव विलास पाटील, साई विश्वस्त मंडळ अध्यक्ष सुनिल पाटील,नायर सुपर स्पे. आय हॉस्पिटलचे ऍडमिन डायरेक्टर विजयश्री पाटील, नवदृष्टी सेवा संस्थेचे समन्वयिका – मनस्वी भिंगार्डे आदि मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या शिबिरात जेष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. असून एकूण 109 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.यावेळी 29 नागरिकांना मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यात येणार आहे.तर 4 व्यक्तींना चष्मे लागले आहेत.असे डॉक्टरांनी सांगितले.यावेळी तज्ञ डॉक्टरांकडुन नागरिकांना डोळ्यांची निगा कशी राखावी या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.जेष्ठ नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला असून या शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला.तपासणी करून घेणाऱ्या व्यक्तींना विजय विकास सामाजिक संस्थेच्या वतीने प्रत्येकास भेट वस्तू देण्यात आली.

हे शिबीर यशस्वी करण्यासाठी विजय विकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोईर, नायर सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल, नव दृष्टी सेवा संस्था नवीन पनवेल व पाणजे मधील ग्रामस्थ यांचा मोठा हातभार लागल्याचे नवतरुण मित्र मंडळ पाणजेचे कार्याध्यक्ष हेमंत पाटील यांनी सांगितले.नवतरुण मित्र मंडळ पाणजेचे अध्यक्ष दर्शन पाटील, कार्याध्यक्ष विश्वनाथ पाटील, हेमंत पाटील, सचिव -एडव्होकेट विक्रम पाटील, सहसचिव दीपेश पाटील, सदस्य मिलिंद पाटील, सुनिल पाटील, मयूर पाटील, महेंद्र पाटील, अनिल पाटील, जिग्नेश भोईर, गौरव पाटील, विजय पाटील, जगदीश भोईर, चंद्रकांत पाटील, जुगल पाटील,सचिन भोईर यांनीही सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here