उपजिल्हा रुग्णालय, राजुरा येथे भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

⭕खासदार बाळुभाऊ धानोरकर आणि आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत उद्घाटन.

राजुरा (ता.प्र) :– राजुरा तालुक्यातील जनतेला तज्ञ डॉक्टरांची वैद्यकिय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने उपजिल्हा रुग्णालय, राजुरा येथे दिनांक २४ एप्रिल, २०२२ ला सकाळी ९ वाजता भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य मेळाव्यात फिजिशियन, शल्य चिकित्सक, बालरोग तज्ञ, स्त्रिरोग तज्ञ, नेत्र रोग तज्ञ, दंत चिकित्सक, नाक कान व घसा तज्ञ, आयुष व युनानी वैद्यकिय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. विविध प्रकारच्या रोगाची तपासणी करून निदान केले जाणार आहेत. या शिबिरात रुग्णांना गोल्डन कार्ड देण्यात येईल..
या शिबिराचे उद्घाटन दिनांक २४ एप्रिल २०२२ ला लोकप्रिय खासदार बाळुभाऊ धानोरकर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे असणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणुन माजी नगराध्यक्ष अरुण घोटे, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, तहसीलदार हरीष गाडे, संवर्ग विकास अधिकारी किरणकुमार धनवाडे, मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर, माजी सभापती मुमताज जावेद आदींची उपस्थिती राहणार आहेत.
आरोग्य मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. निवृत्ती राठोड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार गहलोत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. लहु कुळमेथे वैद्यकिय अधिक्षक व डॉ. प्रकाश नगराळे तालुका वैद्यकिय अधिकारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here