आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

⭕राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना अंतर्गत १९ लाभार्थ्यांना लाभ.

गोंडपिपरी :– राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना अंतर्गत गोंडपिपरी तालुक्यातील १९ लाभार्थ्यांना लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते प्रत्येकी २० हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी संजय डव्हाणे, नायब तहसीलदार किराणकर, गेडाम, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश चौधरी, गोंडपिपरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभूजी येलेकर, शहर अध्यक्ष देवेंद्र बट्टे, नगराध्यक्षा सविता कुळमेथे, उपनगराध्यक्षा सारिका मडावी, बालाजी चनकापूरे, काँग्रेस अनुसूचित जाती जमाती विभागाचे तालुकाध्यक्ष गौतम झाडे, खेमराज गरपल्लीवार, ॲड. सचिन फुलझेले यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *