मोदी सरकारच्या महागाई विरोधात उद्या राजुरा काँग्रेसचे धरणे आंदोलन

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या निर्देशानुसार लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालय राजुरा समोर उद्या दिनांक ४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता राजुरा तालुका काँग्रेस च्या वतीने वारेमाप इंधन दरवाढ करून गोरगरीब, सर्वसामान्य जनतेची लूटमार करणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात महागाई मुक्त भारत हे ब्रीद घेऊन एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
या एक दिवसीय धरणे आंदोलनात सहभागी होऊन केंद्र सरकार पुरस्कृत महागाईचा निषेध नोंदविण्यासाठी आणि केंद्रातील निष्ठूर सरकारला जागे करण्यासाठी समस्त नागरिकांनी यात आपला सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन तालुका काँग्रेस, शहर काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल काँग्रेस, युवक काँग्रेस, अनुसूचित जाती व जमाती विभाग काँग्रेस, अल्पसंख्यक विभाग काँग्रेस, ओबीसी काँग्रेस, एनएसयूआय अशा काँग्रेसच्या सर्व विभागाचे वतीने करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here