राजमाता इंदुताई आंधळकर अन्न छत्रालयातर्फे शिवजयंती साजरी

: माजी मंत्री दिलीप सोपल व अभिनेत्री आसु सुरपुर यांची उपस्थिती


* लोकदर्शन : सुनील भोसले
बार्शी :
बार्शी शहरातील राजमाता इंदुताई आंधळकर अन्नछत्र यांच्या वतीने माजी मंत्री दिलीप सोपल व अभिनेत्री आसु सिरपूर यांच्या उपस्थितीत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन बार्शीचे माजी मंत्री दिलीप सोपल, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, अभिनेत्री आसु सुरपुर , नागेश अक्कलकोठे , शहर प्रमुख दीपक आंधळकर, सुप्रीया गुंड पाटिल, बार्शी शहर पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या हस्ते पुष्पहार घालुन करण्यात आले. शिवजन्म उत्सव मंडळाच्या वतीने मोठा उत्साह साजरा करण्यात आला. सगीर सय्यद, उपशहर प्रमुख इलियास शेख , संतोष पुट्ठे , इरफान बागवान यांनी कार्यक्रम आयोजनाकरिता योगदान दिले. अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ उपाध्यक्ष सुनिल ज्ञानदेव भोसले पुणे पत्रकार व अनेक पत्रकार मंडळी या ठिकाणी उपस्थित होती .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here