Home
Home गडचांदूर / कोरपणा सुनील उरकुडे यांच्या वाढदिवस अनेक समाजकार्य करून साजरा

सुनील उरकुडे यांच्या वाढदिवस अनेक समाजकार्य करून साजरा

 

*⭕सभापती सुनिल उरकुडे यांच्या वाढदिवसाचा युवकांमध्ये क्रेझ*

राजुरा:-

दी ०४/०२/२०२२ ला जी. प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनिल उरकुडे यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने अनेक समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये नोकारी ( खु) येथील विधवा व अपंग निराधारांना वॉटर कॅन वाटप करण्यात आले. तसेच चुनाला येथे अनाथ आश्रम येथील बालकांना भोजन दान करण्यात आले. गोवरी येथील रोजगार हमिमधील कामगारांना प्रोत्साहन म्हणून घमेले व पावडे वाटप करण्यात आले तसेच विधवा व अपंग निराधारांना वॉटर कॅन वाटप करण्यात आले.
जी. प. सभापती सुनिल उरकूडे यांच्या वाढदिवसाचा क्रेझ असंख्य युवकांमध्ये, इस्ट मित्रांमध्ये दिसून आला. अनेक ठिकाणी उरकुडे यांचा वाढदिवस सहकारी मित्र तसेच कार्यकर्त्यांकडून केक कापून जल्लोषात साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here