महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने माँ साहेबांना आदरांजली

*
लोकदर्शन 👉 मोहन भारती

*सोलापूर दिनांक :- ०६/०१/२०२२ :-* महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने स्वर्गीय मिनाताई ठाकरे यांच्या जयंती व ममता दिनानिमित्त कामगार सेना कार्यालय (पद्मशाली ) चौक येथे विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या हस्ते पुजन करून आदरांजली वाहण्यात आली.
महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची धर्मपत्नी शिवसैनिकांची माऊली स्वर्गीय मिनाताई ठाकरे यांना कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी कारमपुरी (महाराज) यांनी माँ साहेबांना कामगार सेनेच्या कार्याला आम्हाला ऊर्जा मिळवून द्या अशी साद घातली यावेळी सर्व पदाधिकारी बंधु – भगिनींनी माँ साहेब अमर रहे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अमर रहे अशा घोषणा दिल्या.
सदर प्रसंगी विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्यासह दशरथ नंदाल, विठ्ठल कुऱ्हाडकर, पप्पु शेख, गणेश म्हंता, गुरुनाथ कोळी, रेखा आडकी, संजीव शेट्टी, अभिराज कांबळे, श्रीधर आडकी, रमेश चिलवेरी, हरीदास शेरला, शोभा पोला, अंबुबाई पेंटा, जिनत वांगीकर, पुजा माळगे यांच्यासह विडी व यंत्रमाग कामगार उपस्थित होते.
*••••••••••••••••••••••••••••••••••••••*
*फोटो मॅटर :- स्वर्गीय मिनाताई ठाकरे यांच्या जयंती व ममता दिनानिमित्त महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आदरांजली वाहण्यात आले. सदर प्रसंगी विष्णु कारमपुरी (महाराज), दशरथ नंदाल, शोभा पोला, रेखा आडकी व कामगार बंधु – भगिनी दिसत आहेत.*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *