सोलापूर वृत्तपत्र पत्रकार संघाच्या वतीने दर्पणकार पं. बाळशास्त्री जांभेकर यांना आदरांजली

लोकदर्शन 👉 मोहन भारती

*सोलापूर दिनांक :- ०६/०१/२०२२ :-* दर्पणकार पत्रमहर्षी पंडीत बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर वृत्तपत्र पत्रकार संघाच्या वतीने दर्पणकार यांना आदरांजली वाहण्याचे कार्यक्रम सोलापूर वृत्तपत्र पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष :- विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या शुभहस्ते श्री जांभेकर यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली .
सोलापूर वृत्तपत्र पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकारीतेचे जनक पंडीत बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त व मराठी पत्रकार दिनानिमित्त सोलापूर वृत्तपत्र पत्रकार संघाच्या वतीने सोलापूर वृत्तपत्र पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष :- विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या शुभ हस्ते श्री जांभेकर यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर उपस्थित सर्व पत्रकारांना व नागरिकांना विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी शुभेच्छा दिल्या .
सदर प्रसंगी पत्रकार संघाचे सचिव विठ्ठल कुऱ्हाडकर, प्रसाद जगता रमेश चिलवेरी , संजीव शेट्टी , अभिराज कांबळे , गुरुनाथ कोळी , रेखा आडकी , पप्पु शेख यांच्यासह पत्रकार बंधु भगिनी उपस्थित होते .
*••••••••••••••••••••••••••••••••••••••*
*फोटो मॅटर : – सोलापूर वृत्तपत्र पत्रकार संघाच्या वतीने पंडीत बाळशास्त्री जांभेकर यांना आदराजंली वाहण्यात आली . सदर प्रसंगी विष्णु कारमपुरी (महाराज) , विठ्ठल कुऱ्हाडकर , प्रसाद जगताप यांच्यासह पत्रकार बांधव दिसत आहेत .*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *