Home
Home गडचांदूर / कोरपणा जिल्हा परिषद शाळा, वडगाव येथे रांगोळी स्पर्धा संपन्न,,

जिल्हा परिषद शाळा, वडगाव येथे रांगोळी स्पर्धा संपन्न,,

लोकदर्शन 👉 मोहन भारती

  • गडचांदूर,,
    जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, वडगाव येथे स्वतंत्रचा अमृत महोत्सव अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांकरीता रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती,या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक महिन्याला एका स्पर्धा चे आयोजन करण्यात येते,शाळा स्तरावर,तालुका स्तरावर,जिल्हा स्तरावर या विद्यार्थ्यांची निवड केली जाते,देशाच्या स्वातंत्र्याची अस्मिता आणि जाणीव विद्यार्थ्यांना बालवयात व्हावी या साठी हा उपक्रम केंद्र सरकारच्या वतीने संपूर्ण भारतात राबविण्यात येत आहेत,
    या उपक्रमाचे नियोजन शिक्षण विस्तार अधिकारी रुपेश कांबळे, उच्च श्रेणी मुख्याध्यापक पांडुरंग बुरांडे,यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक शिक्षक काकासाहेब नागरे,यांनी केले,स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी रामचंद्र रासेकर,अशोक पडाल,सुरेश टेकाम,शिवाजी माने,अनिल राठोड, नितीन जुलमे यांनी सहकार्य केले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here