महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस साजरा

. लोकदर्शन 👉 मोहन भारती


गडचांदूर,,
महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून स्थानिक महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात साजरा करण्यात आला, यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानि प्राचार्या स्मिता चिताडे होत्या, प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे,उपप्राचार्य विजय आकनूरवार,एम,सी व्ही, सी, विभागाचे प्रमुख प्रा, अशोक डोईफोडे, कला विभागाचे प्रमुख प्रा, प्रफुल्ल माहुरे,विज्ञान विभागाचे प्रमुख प्रा, प्रभाकर कोल्हे,उपस्थित होते,
सर्वप्रथम अतिथी च्या हस्ते श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,
प्राचार्या स्मिता चिताडे यांनी गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला, त्याच्या जीवन कार्याची माहिती सांगितली,
प्रास्ताविक उपप्राचार्य विजय आकनूरवार यांनी केले, संचालन प्रा, सुरेखा झाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा, तब्बू शेख यांनी केले,
कार्यक्रमाला विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *