Home
Home गडचांदूर / कोरपणा सावित्रीबाई फुले विद्यालयात वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सोहळा

सावित्रीबाई फुले विद्यालयात वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सोहळा

लोकदर्शन 👉 मोहन भारती

सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूर येथे आज दिनांक 20 डिसेंबर 2021 ला वैराग्यमूर्ती कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेच्या पूजनाने व अभिवादनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे होते त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून गाडगे बाबा यांच्या जीवन कार्याचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला तसेच गाडगेबाबांनी समाजातील अज्ञान,अंधश्रद्धा ,अनिष्ट रूढी परंपरा पाखंड यांच्याविरुद्ध केलेला संघर्ष व समाज जागृतीचे कार्य सोदाहरण समजावून सांगितले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक संजय घाडगे तसेच बावनकर सर, कु.गोपंमवार मॅडम यांनी सुद्धा गाडगेबाबांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन ज्येष्ठ शिक्षक महेंद्र कुमार ताकसांडे यांनी तर आभार प्रदर्शन पाटील सर यांनी केले. कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here