सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयात संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी साजरी।                                       

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदुर : सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयात संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद महाविद्यालयाचे प्राचार्य डी आर काळे यांनी भूषविले तर कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून कनिष्ठ महाविद्यालय कला प्रमुख प्रा. जहीर एस सैय्यद, व्यवसाय प्रमुख प्रा. पि एम वांढरे, विज्ञान विभाग प्रमुख कु. एस एम ताकसांडे उपस्थित होते
कोविड- १९ चा वाढता प्रभाव लक्षात ठेवून आरोग्याच्या दृष्टिकोनातून पूर्ण खबरदारी घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात उपस्थीत असलेल्या सर्व अतिथींनी
वैराग्यमुर्ती संत गाडगे महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
विद्यार्थ्यांच्या वतीने कु. स्नेहा कोटनाके ह्या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले
अध्यक्षीय भाषणातून महाविद्यालयाचे प्राचार्य डी आर काळे यांनी विद्यार्थ्यांना अंधश्रद्धा पासून दूर राहण्याचे आवाहन केले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा पि टी खैरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा ए पि मेहरकुरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कला विज्ञान व व्यवसाय सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here