अभिजीत धोटे यांनी घेतला कुपोषित बालकांच्या परिस्थितीचा आढावा.

लोकदर्शन👉 मोहन भारती

राजुरा :– सेवा कलश फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत धोटे यांनी राजुरा तालुक्यातील चिंचोली खुर्द आणि पोवनी येथील कुपोषित बालकांच्या घरी आणि अंगणवाडीला प्रत्येक्ष भेट देऊन त्यांच्या सध्या परिस्थितीचा आढावा घेतला. काही महीण्यापूर्वी राजुरा येथे सेवा कलश फाऊंडेशन ने तालुक्यातील कुपोषित बालकांना आमदार सुभाष धोटे यांच्या सामाजिक दायित्वा अंतर्गत सकष आहार कीट चे वितरण केले होते. सध्या परिस्थितीत ही मुले कशी आहेत याचा आढावा त्यांनी घेतला. हळूहळू या मुलांमध्ये सकारात्मक बदल दिसून येत आहे हे पाहून आपणास आनंद होत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
या प्रसंगी श्रीमती वैशाली सटाले बाल विकास प्रकल्प अधिकारी राजुरा, श्रीमती छाया नवरखेडे सास्ती बीट सुपरवाझर, अंगणवाडी सेविका चिंचोली (खुर्द) लता उलमाले, व संगीता कष्टी, माया बेसुरवार अंगणवाडी सेविका पवनी,अंगणवाडी मदतनीस सावित्री पेटकर, सुरेखा माथळे, रखमाबाई पोटे, लाभार्थी अमित उदय कळवे, शीतल प्रवीण ईटनकर, लाभार्थी पालक प्रिती उदय कळवे गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here