राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी*

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर – सावित्रीबाई फुले विद्यालय / उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक धर्मराज काळे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक संजय गाडगे,कला विभाग प्रमुख प्रा.जहीर सर, व्यवसाय विभाग प्रमुख प्रा. वांढरे , विज्ञान विभाग प्रमुख प्रा.ताकसांडे मॅडम,सौ. थिपे (चटप) मॅडम , याअनुषंगाने चित्रकलास्पर्धा व वॉलपेपर स्पर्धा ऑफलाईन ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या.कार्यक्रम करीता शिक्षक, शिक्षिका प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन महेंद्र ताकसांडे सर यांनी केले. प्रास्ताविक पर्यवेक्षक संजय गाडगे सर यांनी केले तसेच उपस्थित पाहुण्यांनी महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांच्याकार्याची माहिती दिली आभार कु. शंभरकर मॅडम यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here