शिक्षक क्रीडा व कला महोत्सवाचे त्वरित अयोजन करा : गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशन

by : Mohan Bharti

गडचांदूर :  गोंडवाना विद्यापीठाच्या व संलग्नित सर्व महाविद्यालयीन शिक्षकांच्या कला गुणाचा विकास व्हावा आणि त्यांना त्यांचे कौशल्य तथा सुप्त गुण दाखवण्याची संधी मिळावी याकरिता मागील वर्षी गोंडवाना विद्यापीठ असोसिएशनच्या पुढाकाराने विद्यापीठाद्वारे शिक्षक क्रीडा व कला महोत्सवाचे प्रथमच आयोजन करण्यात आलेले होते परंतु अत्यंत उत्साहाच्या व खेळन्याच्या वातावरणात सुरू झालेले सदर क्रीडा व कला महोत्सव विद्यापीठाने पूर्ण केलेले नाही. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व कला महोत्सव घेण्याबाबत विद्यापीठ ज्याप्रमाणे उत्साह व तत्परता दाखवते तेवढीच उदासीनता शिक्षकांच्या क्रीडा स्पर्धा घेताना विद्यापीठाची दिसून येते हे खेदाची बाब आहे.
मागील वर्षी शिक्षक क्रीडा व कला महोत्सव आयोजित करण्याकरिता गठित समितीने नियोजन व विद्यापीठाने निधी मंजूर केला असताना देखील शिक्षक क्रीडा व कला महोत्सव अपूर्ण का घेण्यात आले याबाबत चौकशी करून उचित कारवाई करावी व यावर्षी मागील वर्षाच्या सर्व क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश करून विद्यापीठाद्वारे शिक्षक क्रीडा व कला महोत्सव 2024 चे लवकरात लवकर आयोजन करून गोंडवांना विद्यापीठाच्या व संलग्नित सर्व महाविद्यालयीन शिक्षकांच्या कलागुणांचा विकास व्हावा व त्यांना आपले कला कौशल्य दाखवण्याची संधी प्राप्त करून द्यावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन कुलगुरू कडे मागणी केलेली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *