श्री संत गाडगेमहाराज जयंती साजरी

By : Ravikumar Bandiwar

नांदा फाटा : 
महासंघ (सर्वभाषिक) शाखा नांदा फाटा ता्.कोरपना जि. चंद्रपूर यांच्या वतीने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते दि. २३/०२/२०२४ रोजी सकाळी 6 वाजता परिसरात ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यात आले एक पाऊल स्वच्छतेकडे 10 वाजता संत गाडगेबाबा यांना अभिवादन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली विशेष अतिथी म्हणून मां. श्री पुरुषोत्तमजी आस्वले उपसरपंच ग्रामपंचायत नांदा आणि प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री रत्नाकर भाऊ चटप आनंदरावजी निब्रड विठ्ठल भाऊ हिरादेवे, गणपतराव चिंचोलकर व कोरपणा तालुका अध्यक्ष सुंदरजी आकनुरवार विदर्भ सचिव वासुदेव जी बेसुरवार हे प्रामुख्याने उपस्थित होते यांच्या प्रमुख उपस्थितीत संत गाडगेबाबाची 148वी जयंती संपन्न झाली या प्रसंगी बीबी येतील महिला मंडळाने गाडगेमहाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे भजन सुद्धा सादर करण्यात आले प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाल्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर उद्घाटन भाषणामध्ये निलेश भाऊ ताजणे यांनी आम्ही समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे सांगून समाजाला वेळोवेळी मदत करण्याचे आश्वासन दिले आणि पुरुषोत्तमजी आस्वले व रत्नाकर भाऊ चटप यांनी समाजाला वेळोवेळी भासणारी गरज पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन आपले मनोगत अतिशय सुंदर अशा शब्दात व्यक्त केले त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कार्यक्रमाला लाभलेले माननीय श्री वामनरावजी तुराणकर साहेब यांनी समाजाने आत्मनिर्भय भारत या योजनेचा आणि विश्वकर्मा योजनेचा जास्तीत जास्त समाज बांधव कसा फायदा घेईल आणि समाज संघटन ही काळाची गरज आहे यावर भाष्य करून समाजाला संघटित राहण्याचे आवाहन करून संघटनेचे महत्त्व कळवुन दिले व गाडगेमहाराज मिशन संस्थेला शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता झाली यामध्ये सूत्रसंचालन प्रास्ताविक श्री मनोहर भाऊ चिंचोलकर चंद्रपूर जिल्हा महासचिव यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नितेश भाऊ क्षीरसागर यांनी केले तर सौ मंगलाताई लोणारे यांनी महिलाचे एकत्रीकरण व संघटीकरण होणे काळाची गरज आहे असे सांगून कार्यक्रमाला सुरुवात केली त्यानंतर विजय भाऊ मेळावार वसंतरावजी थेटे पल्लवीताई बंडेकर यांनी महाप्रसादामध्ये मोलाचा वाटा उचलला यावेळी गणेश भाऊ आंबीलकर वैभव राऊत गणेश आकनुरवार राजू नांदेकर सचिन पोहनकर वैभव आंबिलकर आणि श्री संत गाडगे महाराज मिशन महिला बचत गट नांदाफाटा च्या सर्व महिला आणि नांदा फाटा येथील समस्त धोबी समाज बांधव प्रामुख्याने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होते आणि कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व समाज बांधवांनी सहकार्य केले असेच सहकार्य करत राहून दरवर्षी चांगला कार्यक्रम व्हावा अशी सर्वांनी अपेक्षा व्यक्त केली आणि कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी
समाजातील बहुसंख्य महिला व बालगोपाल पुरुष उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *