प्रहार चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी सतीश बिडकर व शेरखान पठाण यांची नियुक्ती* ♦️तर प्रहार दिव्यांग आंदोलन क्रांती च्या जिल्हाध्यक्षपदी पंकज

लोकदर्शन 👉 मोहन भारती

प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा दिव्यांग कल्याण विभाग प्रमुख यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्षाच्या चंद्रपूर जिल्हा प्रमुखपदी सतीश बिडकर व शेरखान पठाण तर प्रहारचे दिव्यांग संघटना जिल्हाध्यक्ष पंकज माणूसमारे यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली.
सतीश बीडकर यांच्या कडे चंद्रपूर बल्लारपूर, मुल पोंभूर्ना, राजुरा,कोरपना, जिवती, गोंडपिपरी, तर शेरखान पठाण यांच्याकडे भद्रावती, वरोरा, चिमूर, ब्रम्हपुरी, नगभिड,सिंदेवाही,सावली, हे तालुके वाटण्यात आले कोणत्याही टोकाच्या कार्यकर्त्याला कुटलाही त्रास होऊ नये या हेतूने योग्य निर्णय घेतला
प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू भाऊ कडू हे २६ सप्टेंबर रोजी चंद्रपूर दौऱ्यावर आले असताना त्यांच्या आदेशाने या निवडी करून नियुक्तीपत्र देण्यात आले.
सतीश बिडकर शेरखान पठाण व पंकज माणूसमारे यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व जिल्हाभरातून कौतुक करण्यात येत आहे. आगामी काळात प्र- हार पक्षाचे व बच्चू भाऊ यांचे विचार रुजवण्यासाठी सतत काम करत राहणार. प्रश्न मार्गी लावण्या करिता कटी बद्ध राहील, असा बिडकर यांनी दिला. तर चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागात पक्षाची मजबुत बांधणी करत बच्चू भाऊच्या विचारांना बळकटी देण्याचा निर्धार शेरखान पठाण व पंकज माणूसमारे यांच्याकडून करण्यात आला. यावेळी स्वीय सहाय्यक अमित वानखेडे , संजय गोमकाळे, अतुल निमरड, अमित बहादुरे,अक्षय बोंदगुलवार, गणेश उराडे, संदीप झाडे विशाल कुडे, अमोल दातारकर, हर्षल ढोके, अमोल काटकर, ओंकार कांबळे, परमेश्र्वर वाघमारे, अनुप राखुंडे, नितेश कोडपे व जिल्हाभरातील प्रहारचे पदाधिकारी उपस्थित

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *