इन्फंट कॉन्व्हेंट येथे विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंची प्रदर्शनी.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे इयत्ता २ ते १० वर्गातील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध वस्तूंची प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.
यात विद्यार्थ्यांनी टाकावू वस्तूपासून टिकावू वस्तू बनविल्या. शिल्पकला, मॉडल्स ग्रीटिंग कार्ड , पेपर कटिंग करून विविध चित्र काढणे अशा विविध वस्तू बनवून त्याचे प्रदर्शन भरविण्यात आले.
या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी तसेच शाळेतील शिक्षिका विद्या चौधरी, रिना मॅडम, आरती मॅडम व इतर शिक्षकांनी सुद्धा या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत केले. या उपक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थीनी सहभाग घेतला. या प्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *