इतिहास घडविणारे विदर्भ लेखिका साहित्य संमेलन अकोला येथे संपन्न **********

लोकदर्शन अकोला👉प्रा. अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
भारतातील पहिल्या ओबीसी महिला साहित्य संमेलनाचे २०१९ मध्ये अध्यक्ष पद भूषविल्यानंतर खऱ्या अर्थाने सर्व महिलांच्या लेखनाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला मी सुरुवात केली. विदर्भातील अकराही जिल्ह्यांमध्ये अशा थोडं थोडं येणाऱ्या लेखिकांना मी  पूर्वीच  एकत्र केलेले  होतेच .विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये ८०० ते ९०० महिला एकत्रित झालेल्या या महिलांच्या  लेखनाची  गती वाढावी..
लेखन  सकस  व्हावे .या करता कोणतेही शुल्क नआकारता सातत्याने लेखनाचे विविध उपक्रम आणि कार्यक्रम आखल्या गेले.
दरम्यान कोरोना मुळे लॉकडाऊन झाले परंतु लॉकडाउनच्या काळातही अनेक ऑनलाईन उपक्रम घेऊन त्यांच्या लेखणीला प्रोत्साहित करत राहिले. त्याचाच प्रत्यय विदर्भातील २०४ कवयित्रींच्या सहभागांचा ४०८ कविता असलेला ‘काव्यवसा’ हा मोठा उपक्रम पार पाडला. काव्यवसा भाग एक ,दोन ,तीन आणि चार असे चार देखणे
प्रतिनिधिक काव्यसंग्रह बाहेर  आले. माझ्या लेखिका भगिनींचा माझ्यावरील विश्वास वाढला .आता आपण एकत्रित आले पाहिजे आणि एकमेकांचे साहित्य प्रत्यक्षात ऐकलं पाहिजे ..बघितलं पाहिजे अशी अपेक्षा वाढली.
त्यातून विदर्भ लेखिका साहित्य संमेलन व्हावं ही इच्छा प्रबळ झाली. प्रत्येक मीटिंगमध्ये हाच विषय पुढे यायचा.. इतकं मोठं शिवधनुष्य कसं   पेलायचं ..? आज आपल्याकडे तर एकही रुपया नाही. आपल्याला एवढ आर्थिक सहाय्य  कोण करणार…? या विषयामुळे मी थांबून जात असे.. परंतु सर्व लेखिका भगिनींच्या मनातील दुर्दम्य इच्छाशक्ती ने मला हे कार्य मनावर घ्यायला भाग पडले..
‘ताई तुम्ही मनावर घेतले तरच हे होऊ
शकते अन्यथा नाही….’ हे  त्यांचे  वाक्य मला सतत अस्वस्थ करू लागले
आणि ‘पाहून घेऊ कसं होतं ते.. हा मी निर्धार केला ‘ आणि  हे शिव धनुष्य
पेलायचे  ठरविले.पाहता पाहता हा विदर्भ लेखिका साहित्य संमेलनाचा महापर्वत मला पेलता आला ..त्याचाच प्रत्यय दिनांक २३ आणि २४ एप्रिल अकोला येथे संपन्न झालेले ऐतिहासिक
विदर्भ लेखिका साहित्य संमेलन होय..
“कधीकाळी माझी कथा एखाद्या साहित्य संमेलनाच्या मंचावर जाईल,
कधीकाळी मला एखाद्या परिसंवादात वक्ता म्हणून संधी मिळेल ,कधीकाळी एखाद्या साहित्य संमेलनात माझ्या कवितेला प्रचंड दाद मिळेल…असे स्वप्नही  मी पाहिले  नव्हते  ..ते
स्वप्न साकार झाले.” असे अभिप्राय
देतांना लेखिका भगिनी भारावून गेल्या. त्यांच्या डोळ्यात आलेल्या
आनंदाश्रुनि मलाही भावविभोर केले.
आणि ..नितांत आखिव  रेखीव ..देखणे.. उत्तम भाषणे.. पुरणपोळीच भोजन.. थंडगार पाणी.. परिसंवादातून उलगडणारे स्त्री मनाचे विविध कप्पे आणि वैदर्भीय लेखिकांच्या लेखणीचा दरवळ….साहित्यासोबतच कलानृत्यविष्कार अशा सर्व वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेले विदर्भ लेखिका साहित्य संमेलन अकोला येथे गाजले.
मुख्य आयोजक प्रा.विजया मारोतकर यांच्यावर होणारा कौतुकाचा वर्षाव संपता संपत नाही..त्यांच्या संकल्पनांना  माई देविकाताई देशमुख यांनी सहकार्य  केले.. स्वागताध्यक्षाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी
डॉ. विजय दुतोंडे यांनी सहर्ष स्वीकारली
आणि  ऐक ऐतिहासिक साहित्य संमेलन साकारले.
ग्रंथदिंडीने विदर्भ लेखिका साहित्य संमेलनाची सुरुवात झाली. लेझीम पथकाने घेतलेला सहभाग आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मा. जिजाऊ, झाशीची राणी यांच्या  वेशभूषा आकर्षक ठरल्या.. संमेलन अध्यक्ष डॉ. शोभाताई रोकडे, उद्घाटक डॉ.मनीषा यमसनवार,प्रमुख अतिथी विजयाताई ब्राह्मणकर,प्रा.किशोर बुटोले
डॉ. सुचिता पाटेकर, स्वागताध्यक्ष डॉ. विजय दुतोंडे यांचे सह मंचावर मुख्य आयोजक प्रा. विजया मारोतकर आणि देविकाताई देशमुख उपस्थित होत्या .
विजया मारोतकर यांनी प्रास्ताविकातून साहित्य संमेलनाच्या आयोजना मागची भूमिका स्पष्ट केली. आपल्या अवतीभवती अनेक साहित्य संमेलन होतात परंतु कळकळीच दमदार लिहिणाऱ्या अनेक लेखिका त्या मंचापर्यंत पोहोचतच नाही किंवा पोहोचण्याची शक्यताही नाही. अशा वातावरणात या संमेलनाचे उभे राहणे नितांत आवश्यक भासले आणि याच्या उभारणीच्या तयारीला सुरुवात केली… एकही रुपया जवळ नसताना अशा  लाखो रुपयाच्या आयोजनाची संकल्पना मांडली गेली..मूर्त स्वरूपातील  साकार रूप अस्तित्वात आले.दोन दिवस झालेल्या या साहित्य संमेलनात  विदर्भाच्या कानाकोपऱ्यातील लेखिका उपस्थित होत्याच परंतु गोवा येथूनही पाच
लेखिका उपस्थित होत्या.
अकोला येथे संपन्न झालेल्या साहित्य संमेलनाची स्थानिक धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या माई देविका ताई देशमुख यांनी या योजना मागची आपली भूमिका स्पष्ट केली.
उद्घाटन सत्रात आठ लेखिकांच्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेला ‘अलख’  हा विशेषांक, उषा भोपळे यांचा ‘चंद्राचे घर’ काव्यसंग्रह, डॉ. प्राची निचळ यांचा ‘यथार्थ दर्शन’ काव्यसंग्रह, विजया ब्राम्हणकर यांची ‘घन आले ओथंबून’ ही कादंबरी ,देविका देशमुख यांचे ‘अलख निरंजन ‘ हे पुस्तक, विजया कडू यांचा ‘आरसा’ हा काव्यसंग्रह, ज्योती ताम्हणे
यांचा ‘निळाई’ हा काव्यसंग्रह, डॉ. वैशाली कोटंबे यांचा ‘दिव्य अलौकिक प्रतिभा लाभलेला कवी केशवसुत’ हा ग्रंथ अशा आठ पुस्तकांचे मान्यवरांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळ्यात प्रकाशन झाले आणि वैदर्भीय लेखिकांच्या लेखन प्रतिभेचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्त्रियांना ‘विदर्भ स्त्री रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यातआले.
ज्यात मीराताई ठाकरे- काव्य क्षेत्र, प्रतिभाताई कुलकर्णी’ नाट्य क्षेत्र, संध्या राजुरकर -पत्रकारिता ,संगीता धोटे- समाजकार्य व खुशबू चोपडे क्रीडाक्षेत्र
यांचा समावेश होता.
सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल ,श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
मान्यवरांनी आयोजनाचे विशेष कौतुक केले “पोरी जरा जपून” या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या विजया मारोतकर यांनी आयोजनाच्या क्षेत्रात ही स्वतःची ठळक अशी नाममुद्रा उमटवली असून त्यांच्या वतीने आयोजित असलेले हे सातवे साहित्य संमेलन  होय..जे नितांत उंचीवर जात आहे.. असे उदगार प्रा. किशोर बुटोले यांनी काढले तर डॉ. सुचिता पाटेकर यांनी मी अशा उपक्रमाच्या पाठीशी कायमच राहील. महिलांची उन्नती सर्व  दिशांनी व्हायला पाहिजे,असा आशावाद मांडला. डॉ. विजय दुतोंडे यांनी ‘नि:शब्द’ अशा शब्दात आपली प्रतिक्रिया नोंदवत विजयाताई आणि देविकामाई यांचे कौतुक केले .मी त्यांची धावपळ पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत बघतो आहे .आर्थिक.. शारीरिक.. मानसिक पातळीवर होणारी दमछाक साधी गोष्ट नाही ,परंतु कुठेही हतबल न होता हाती घेतलेलं ध्येय पूर्णत्वास नेण्याचा त्यांच्या वसा पाहून मी ‘नि:शब्द’ असे म्हणालो..
सुप्रसिद्ध कादंबरीकार विजयाताई ब्राह्मणकर यांनी विजया मारोतकर यांच्या धडाडीचे भरभरून कौतुक केले. त्यांचे प्रत्येक पाऊल आणि कार्य हे उत्तमच असते. आज या विदर्भ लेखिका साहित्य संमेलनाच्या आयोजनाने  त्यांच्या कार्याला तेजोमय केलेले आहे.. अशा शब्दात आपली भूमिका मांडली.डॉ.मनीषा यमसनवार उद्घाटक म्हणून मंचावर उपस्थित होत्या.. त्यांनी आपल्या उद्घाटकीय भाषणातून विदर्भीय लेखिकांच्या लेखनाप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या.विदर्भ लेखिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. शोभाताई रोकडे यांच्या भाषणांनी सभागृह अंत:र्मुख झाले. अगदी सहज त्यांनी वैदर्भीय लेखिकांच्या मनाचे अंतरंग उलगडले…त्यांच्या मनातला कोलाहल  मांडला आणि पुरुष असेपर्यंत ती आत्मकथनच लिहू शकत नाही, ही तिची खरी व्यथा आहे.. हे जळजळीत सत्य मांडत महिलांच्या डोळ्याला पदर लावला… पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांना मोकळा श्वास घेता आलाच नाही  .तो  मोकळा श्वास
घेण्याकरता अशी संमेलने नित्तांत गरजेचि आहे असे म्हणत.. शुभेच्छा देत.. आयोजकांचे बळ वाढविले.
डॉ. रूपाली साळवे यांच्या गणेश वंदना नृत्याने उद्घाटन सत्राची सुरुवात झाली. नागपूरच्या प्रज्ञा खोडे,नीता अल्लेवार, प्रणिती कळमकर, डॉ.मोनाली पोफरे यांनी स्वागत गीत सादर केले .

दर्जेदार उद्घाटन सत्रानंतर समारोप सत्रापर्यंत साकार झालेल्या विविध दहा सत्रांमधून वैदर्भीय लेखिकांची प्रतिभा व लेखन  दमदारपणे साकारत गेली.
उद्घाटन सत्रानंतर लगेच’ वैदर्भीय लेखिकांचे लेखन’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. डॉ.उषा किरण आत्राम या परिसंवादाला अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या तर यवतमाळच्या निशा डांगे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
या सत्रामध्ये आजवर विदर्भातील लेखिकांनी केलेल्या लेखनावर प्रकाश टाकण्यात आला. नागपूर येथून आलेल्या डॉ वसुधाताई पांडे यांनी विदर्भातील लेखिकांच्या कादंबरी लेखनाचा उलगडा केला.
ज्यामध्ये सर्व पट उलगडत नेला.
वसुधा ताई पांडे  आपल्या भाषणात असे म्हणाल्या की, ही साधू संतांची भूमी आहे. अनेक प्रेरणास्थान आहेत पहिले प्रेमपत्र लिहिणारी विदर्भातील रुक्मिणी ही पहिली होय. त्यांनी कादंबरीकारांचे  सुद्धा आणि वाचकांचे सुद्धा कसब पणाला लावणाऱ्या कथा असतात. या कादंबरीतून अनेक सिरीयल,सिनेमा निघतात.नायिका  प्रधान लेखिकाला कथा बीज मिळतात हे कथन केले. सुगंधा शेंडे, शकुंतला खोत,क्षमा लीमये, मालती निमखेडकर, तसेच  विदर्भातील कादंबरीकार आशाताई बगे,शुभांगी ताई भडभडे यांच्या कादंबऱ्यांचा उल्लेख केला तसेच विजया मारोतकर यांची ‘धुक्यात हरवली वाट,’ विजया ब्राह्मणकर सामाजिक समस्येवर आधारित कादंबरी मानवी मूल्यांचे नाते
याबाबतचा उलगडा करत
वैदर्भीय कादंबरीकार
सुप्रिया अय्यर , ज्योती पुजारी,जयश्री रुईकर, प्रतिमा इंगोले, भारती सुदामे, या सह  अनेक लेखिकांचा उल्लेख केला.

डॉ.भारती खापेकर यांनी वैदर्भीय लेखिकांच्या  कथालेखनाबाबत आपले मनोगत व्यक्त केले .अनेक कथा लेखिकांच्या नामाचा उल्लेख केला.
डॉ. भारती खापेकर यांनी
सांगितले की कथा  एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे गेलेली आहे. लघुकथा, किर्लोस्कर मासिक, ग्रामीण कथा हे पण एक माध्यम  राहिले आहे. आशाताई बगे   ,शैलजा काळे, विजया ब्राह्मणकर, विजया मारोतकर या लेखिकांच्या विविध  कथांचा  उल्लेख केला.
डॉ. वैशाली कोटंबे यांनी निसर्ग कविता, प्रेम कविता केशवसुतांच्या कविता यांचा उल्लेख केला तसेच विजया मारोतकर यांच्या कवितांचा
चा उल्लेख केला.देविका ताई देशमुख, अनघा सोनखासकर, उषा किरण आत्राम,निशा डांगे,स्वप्ना पावडे, स्मिता गंधे,वसुधा पांडे,शीलाताई गहलोत या च्या काव्य लेखनाचा उल्लेख करत असताना विदर्भ लेखिका संघटनेच्या वतीने राबविण्यात आलेल्या काव्यवसाय या २०४ कवयित्रींच्या काव्य प्रोजेक्टवर लक्ष वेधले.

संजीवनी काळे समीक्षणाद्वारे अनुभव इंदिरा संत यांचा उल्लेख केला. नोकरीतील समस्या आपत्ती . मुलांच्या आत्महत्या. लिव इन रिलेशनशिप .
बाल गुन्हेगारी याविषयी चर्चा केली.
निशा डांगे प्रमुख पाहुणे  होत्या. स्क्रीन टाईम कमी केला तर लाईफ टाईम जास्त होईल हा आशावाद केला.. त्यांनी गझल विषयी पण सांगितले . कथा ललित हे कथन केले.. पुस्तके वाचण्याची कला वाढायला हवी असे सांगितले.
उषा किरण आत्राम अध्यक्ष या  नात्याने
सर्वांच्या भाषणाचा आढावा घेतला. तसेच ऐतिहासिक माहिती सांगितली. तसेच महिलांची स्थिती रुढीपरंपरा याविषयी चर्चा केली सिंधू मांडवकर, आशा बघे  स्त्रियांचे शोषण जुने साहित्य कथा यावर वक्तव्य केले. दलित तळागाळातील स्त्रिया शोषण लेखन अत्याचार बलात्कार होतात पुरुषी वर्चस्व आहे असे प्रतिपादन केले. दर्जेदार साहित्य असावे अशा अपेक्षा केल्या. हा परिसंवाद अतिशय सुंदर रंगलेला होता. सूत्रसंचालन अरुणा कडू यांनी केले आणि
आभार प्रदर्शन प्रतिभाताई पाथ्रीकर यांनी केले .

तिसऱ्या सत्रात माधुरीताई आशिरगडे
यांच्या अध्यक्षतेत आणि प्रिया कालिका बापट यांच्या प्रमुख उपस्थितीत’ मृदगंध ‘हे कवी संमेलन संपन्न झाले. विदर्भाच्या मातीशी नाळ जोडून असणाऱ्या जवळपास 25 कवयत्रींनी शेती मातीच्या.. शिवाराच्या.. जगण्याच्या ..पीक पाण्याच्या विविध कविता सादर करून सभागृहात वेगळे चैतन्य निर्माण केले .
साधना काळबांडे आणि अंजली नालमवार यांनी नितांत सुरेख सूत्रसंचालन केले..

चौथ्या सत्रात कप्पा मनाचा: माझ
आईपण या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.
डॉ. विना राऊत यांच्या अध्यक्षतेत संपन्न या परिसंवादाला चित्रा क्षीरसागर    प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. सहभागी दहा लेखकांनी  आपल्या अनुभवातून आईपण व्यक्त केले.

आपल्या जगण्याचेच विषय असल्यामुळे मोकळेपणाने लेखिकांना आपला विषय मांडता आला. सत्य हे सुंदर असतं या नात्याने प्रत्येक वक्त्यांनी मांडलेले विचार श्रोत्यांच्या काळजाला हात घालणारे होते. त्यातल्या त्यात माया दुबळे मानकर, डॉ. जया जाने,प्रज्ञा खोडे यांच्या अनुभवांनी सभागृहाला अंतर्मुख केले.
प्रणोती कळमकर, अंजली नालमवार ज्योती ताम्हणे,विजया कडू ,प्रज्ञा  खोडे

या सहभागीनिआपली मते व्यक्त  केलीत. कोणाचेच आई पण कुणा सारखं असू शकत नाही. एकापेक्षा एक दमदार अनुभव ऐकून सभागृह सुन्न झाले. या सत्राचे सूत्रसंचालन कविता शिरभाते यवतमाळ यांनी केले तर आभार साधना काळबांडे यांनी मानले.
विदर्भामध्ये नव्याने दमदार गझलकारा तयार होतात आहे.. ही नितांत  जमेची बाजू आहे. याचाच प्रत्यय पाचव्या सत्रातील गझल मुशायरा मध्ये आला. गझल मुशायऱ्याचे अध्यक्षपद मा. गझलकारा मंगलाताई नागरे यांनी भूषविले. गझल मुशायऱ्यात सहभागी सर्व गझलकरांनी जबरदस्त गझल सादरीकरण केले.
प्रियंका गिरी दर्यापूर, स्मिता पांडे यवतमाळ ,शालिनी बेलसरे अमरावती, उज्वला इंगळे कारंजा लाड ,अरुणा  कडू नागपूर, कविता शिरभाते पुसद, स्नेहा शेवाळकर पुसद यांच्याद्वारे सादर गझल मुशायरा सर्वांच्या काळजात घर करून गेला. या सत्राचे सूत्रसंचालन निशा डांगे यांनी केले तसेच आभार उज्वला पाटील यांनी मानले

या सत्रात लेखिकांना आपल्या कलागुणांना वाव देण्याची पुरेपूर संधी मिळाली. एकपात्री, नाट्यछटा, नृत्य आणि दिलखेचक गाणी असलेल्या कलारंग सत्राने सर्वांचे मनोरंजन केले.
ज्यांच्या अथक परिश्रमाने हे साहित्य संमेलन पार पडत होत्या त्या संमेलनाच्या आयोजक
विजयाताई मारोतकर आणि देविकामाई देशमुख  यांनी
कलारंगचे आतिथ्य स्वीकारले होते.
त्यांच्या उपस्थितीने कलारंगला एक वेगळा हुरूप आला होता.
विजयाताई आणि देविकामाई यांनी कलारंगचे दीप प्रज्ज्वलन केले.
कलारंग कार्यक्रमाची दमदार सुरुवात  सौ.रश्मी कुलकर्णी आणि सौ.शिल्पा ढोक यांनी दीप नृत्य सादर करून केली  त्यामुळे वातावरण निर्मिती झाली.
भावना टेकाडे,नागपूर. यांनी फुलराणी साकारून विनोदी संवादाची निर्मिती करत वातावरणात रंगत आणली.
उठले अंतरंगी,आनंदाचे तरंग
सांस्कृतिक कार्यक्रमात, मन दंग
स्मृतींमधे साठवला आस्वाद संग
उत्साहाने झाला,कलारंग,
कलारंग कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेले अतिशय सुंदर,एक सुर,एक ताल,एक पदन्यास जपणारे समूह नृत्य, माया दुबळे, अरुणा कडू,निता अल्लेवार, प्रनोती कळमकर आणि प्रज्ञा खोडे , या नागपूर चमूने सादर केले.
साधना काळबांडे,आकोट यांनी शाळेविषयी अनास्था असलेल्या शालेय मुलीची,एकपात्री प्रयोगातून विनोदी
भूमिका साकारून सभागृहात हास्य पिकवले.नागपूरच्या पद्मिनी दुरुगकर यांनी ताराराणी यांची आकर्षक आणि दमदार भूमिका सादर केली. नागपूरच्या डॉ.वीणा राऊत यांनी इंदिरा गांधी यांची वेशभूषा धारण करून त्यांची अतिशय आवेशपूर्ण आणि रोमांचकारी भूमिका सादर करून बघणाऱ्या भगिनींची मने जिंकून घेतली. सौ.विजया भांगे यांनी वर्हाडी भाषेतील एकपात्री विनोदी प्रयोग,”तूं काहीच नको करू” चे सादरीकरण करून, विनोदातून स्त्री भूमिका मांडून सभागृहात चैतन्य निर्माण केले.उज्ज्वला पाटील, यांनी सोलो डान्स केला तर मोनाली पोफरे, यांनी  “सत्यम.. शिवम.. सुदरम..” हे नृत्य सुंदर पद्धतीने  सादर केले.चंद्रपूरच्या अलका रेवतकर यांनी अतिशय दमदार आणि अभिनय पूर्ण “मी सावित्री बोलते” हा एकपात्री प्रयोग करून सभागृहातील प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे केले.ॲड.रजनी बाविसकर यांनी विनोदी कविता सादर केली.सौ.विजया कडू
पथ्रोट,सौ.विशाखा राजे ,नागपूर.स्नेहा शेवाळकर,शालिनी शिरभाते,अमरावती सौ.वैशाली शिरसाट,नागपूर.यांनी सदाबहार सिनेगीत गाऊन आपली कला सादर केली.
कलारंग कार्यक्रमामुळे सर्व लेखिकांचा दिवसभराचा थकवा पळून गेला होता. विजयाताई
मारोतकर आणि देविकामाई देशमुख यांनी पूर्ण वेळ उपस्थित राहून सूत्र संचालकांचा उत्साह वाढविला.सर्व सख्यांसाठी अविस्मरणीय आणि बहारदार कार्यक्रम म्हणून कलारंगनी सर्वांच्या मनात जागा घेतली.
कलारंग मधे सादरीकरण करणाऱ्या सर्व भगिनींना आयोजकांकडून प्रमाणपत्र,पुष्पगुच्छ आणि वाचनीय पुस्तक देऊन भुषविण्यात आले.
विदर्भ लेखिकांच्या शिल्पकार यांनी संपूर्ण संमेलनाची धुरा सांभाळून “न भूतो,न भविष्यती”.असे सम्मेलन घडवून आणले.केवळ महिला आणि महिलांचाच सहभाग असलेले हे संमेलन ऐतिहासिक ठरणार आहे.
संपूर्ण विदर्भातील लेखिकांसाठी असलेले हे संमेलन सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावी अशी एक संधी होती.
सर्वांसाठी हे सम्मेलन अविस्मरणीय राहणार आहे. या सत्राचे बहारदार सूत्रसंचालन विजयाताई भांगे यांनी केले.
दिनांक २४ एप्रिल २०२ दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता सातव्या सत्राला 1 सुरुवात झाली. या कथाकथन सत्राचे अध्यक्षपद डॉ. अनघा सोनखासकर यांनी भूषविले तर तोष्णा मोकडे,आशा फुसे, स्मिता लांडे , विद्या  राणे
यांनी एकापेक्षा एक दमदार कथा सादर करत ही कथाकथन सत्र नितांत उंचीवर नेले. समाजाच्या ऐरणीवर असलेले अवतीभवतीचे नितांत टोकदार विषय कथाकथनाच्या सत्राचे आकर्षण ठरले.
एडवोकेट रंजना बावस्कार यांनी देखणे
सूत्रसंचालन केले तर डॉ. वैशाली कोटंबे यांनी आभार मानले.

आजवर ज्यांना कोणत्या साहित्य संमेलनात कथा सादर करायची संधी मिळाली नाही त्या कथाकारांना इथे कथाकथन करण्याची संधी मिळाली म्हणून आमचे जगणे सार्थक झाले अशी त्यांची प्रतिक्रिया आयोजकांना समाधान देणारी होती नव्हे तर आयोजकांचा उद्देशच अशा दडलेल्या कलागुणांना शोधून काढणे आणि त्यांना मंच देणे हा होता. जो सफल झाला.
सत्र आठवे-डॉ. ममता इंगोले यांच्या अध्यक्षतेत परिसंवादा चे  ३ रे सत्र संपन्न झाले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *