कोरपणा व जिवती तालुक्यात शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित होणार ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️आमदार सुभाष भाऊ धोटे यांच्या प्रयत्नांना यश


,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर👉 /प्रा,अशोक डोईफोडे/
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र हे कोरपणा व जीवाती तालुक्यात लवकरच कार्यान्वित होणार आहे यामध्ये गडचांदूर नगरपालिका कार्यक्षेत्रात दोन, कोरपणा नगरपंचायत क्षेत्रात एक, तर जिवती नगरपंचायत एक क्षेत्रात सुरू होत आहे.

सदर नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राला कोरपणा व जिवती इथे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असे नाव राहील तर गडचांदूर येथे त्यांचे नाव नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र असे राहील. यामध्ये एक एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी, एक स्टाफ नर्स एक आरोग्य सेवक व परिचारक अशा प्रकारची रचना राहणार आहे.
सदर दवाखाने हे ग्रामीण रुग्णालयापासून दूर झोपडपट्टी जिथे गोरगरीब श्रमजीवी लोक राहतात अशा भागात स्थापित करण्यात येणार आहे यामध्ये गडचांदूर येथे आदर्श शिंदे शाळेच्या समोर तसेच पिंपळगाव रोड मेश्राम लेआउट, कोरपना येथील पोस्ट ऑफिस जवळ व जिवती येथे तहसील ऑफिसच्या समोर राहणार आहे.

व याची वेळ दुपारी दोन ते संध्याकाळी आठ असा असेल अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी कोरपणा व जिवती डॉ स्वप्नील टेंभे यांनी दिली आहे.
याचा तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान राजुरा विधानसभा चे आमदार माननीय सुभाषभाऊ धोटे यांनी केले आहे. यामध्ये प्रामुख्याने दैनंदिन आजार माता व बालसंगोपन विषयक बाबी त्याचप्रमाणे मधुमेह, उच्च रक्तदाब याची तपासणी होईल तसेच राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम ,राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम ,हिवताप आदी आरोग्य विषयक राष्ट्रीय कार्यक्रम प्रभावीपणे राबवल्या जाण्यास याची मदत होणार आहे.
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *