आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते राजुरा तालुक्यात १ कोटी ४५ लक्ष रुपये निधीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आज पार पडले. यात ग्रामपंचायत भेंडवी अंतर्गत गेरेगुडा येथे पाणीपुरवठा योजनेचे बांधकाम करणे ४२ लक्ष, मौजा भेंडवी येथे हनुमान मंदिर परिसरात संरक्षण भिंत बांधकाम करणे, पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम करणे ३१ लक्ष, मौजा लाईनगुडा ग्रा. प. भेंडवी येथे पाण्याची टाकी परिसराला संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे, मौजा सालेगुडा , बालेगुडा ग्रा.प. सोनापुर येथे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम करणे ६३ लक्ष रुपये निधी च्या विविध विकासकामांचा समावेश आहे.
या प्रसंगी राजुराचे संवर्ग विकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे, भेंडवीचे सरपंच शामराव पा. कोटनाके, सोनापूरचे सरपंच जंगु पा. वेडमे, उपसरपंच सुनिल आत्राम, उपसरपंच नागेंद्र मेश्राम, ग्रा. प. सदस्य रमेश मडावी, अंकुल आत्राम, तानेबाई मडावी, रेश्मा आत्राम, शारदा, परचाके, रंजीता पंडगुलवार, लक्ष्मीबाई कोटोलु, गाव पाटील मोफत कुडसंगे, गोविंद मडावी, सांगु मडावी, रामशेव कुडसंगे, रामचंद्र कोरवते, ग्रा प सदस्य सिताराम कन्नके, सुभद्राबाई वेडमे, मानुबाई मडावी, सुरेखा पंधरे, गाव पाटील लिंगु पाटील कुमरे, पोलिस पाटील गोपाल कोटनाके यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *