गडचांदूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार. – आमदार सुभाष धोटे.* *गडचांदुर येथे १ कोटी ८० लक्षाच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण संपन्न.*

 

लोकदर्शन.👉 मोहन भारती

कोरपना :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते नगर परिषद गडचांदूर येथे १ कोटी ८० लक्षाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण पार पडले. यात प्रामुख्याने नगर परिषद गडचांदुर येथे सार्वजानक बांधकाम विभाग द्वारा समाजिक न्याय विभाग निधी अंतर्गत मौजा गडचांदूर येथील मेश्राम ले आऊट येथे सामाजिक सभागृहचे बांधकाम करणे किंमत २० लक्ष रुपये, नगरोत्थान योजना निधीअंतर्गत माणिकगढ सिमेंट कंपनी गेट पासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम करणे, किंमत १ कोटी, न प गडचांदूर प्रभाग क्रमांक ७ मध्ये गोसाई चांदेकर यांचे दुकान ते शिवाजी धूपे यांचे घरा पर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकाम करणे,किंमत १० लक्ष रुपये, न प गडचांदुर प्रभाग क्रमांक ७ मध्ये प्रफुल रामटेके ते मुस्कान हमीद यांचे घरा पर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकाम करणे, किंमत १० लक्ष रुपये, न प गडचांदुर शेख एजाज ते नयनसुख निरंजने यांचे घरा पर्यंत नाली बांधकाम करणे, किंमत १० लक्ष रुपये, न प गडचांदुर टिकले ले आऊट येथे सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम करणे, किंमत १० लक्ष रुपये इत्यादी विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि न प गडचांदूर अंतर्गत २० लक्ष निधी खर्चून उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सौंदर्यीकरण कामाचे लोकार्पण करण्यात आले.
या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या सौंदर्यीकरणातून गडचांदूर शहराच्या वैभवात भर पडलेली आहे. या वैभवाला साजेशी भव्य अशी छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ प्रतिकृती आपण स्वखर्चाने येथे बसवून देऊ तसेच नगर सेविका जयश्री ताकसांडे यांच्या मागणीनुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सौंदर्यकरण करण्यात येईल असे आश्वासन आमदार सुभाष धोटे यांनी दिले. महापुरुषांचे विचार आणि जीवनतत्वे समाजाला प्रेरित करीत असतात. त्यांच्या प्रेरणेनेच आपण क्षेत्राच्या निरंजन विकासासाठी झटत असून महापुरुषांच्या प्रेरणेने नव्या जुन्या पिढीने प्रगती करावी ही अपेक्षा आहे. या प्रसंगी मूर्तिकार तथा कलाकार गणेश वनकर यांचा आमदार धोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वच्छोत्सव २०२३ अंतर्गत महिलांचा स्वच्छते मधील सहभाग व त्यांचे नेतृत्व वृद्धिंगत होण्यासाठी आणि सर्व नागरिकास स्वच्छतेचे महत्त्व आणि सवयी लावण्यासाठी स्वच्छतेची शपथ देण्यात आली. तसेच नगर परिषद गडचांदूर च्या २० महिला सफाई कामगार कर्मचाऱ्यांचे आ. धोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
या प्रसंगी नगराध्यक्षा सविता टेकाम, ज्येष्ठ नेते अरुण निमजे, माजी तालुकध्यक्ष विठ्ठल थीपे, बाळकृष्ण मोहितकर, उपनगराध्यक्ष शरद जोगी, नगरसेवक तथा गटनेता विक्रम येरणे, नगरसेवक राहुल उमरे, . मीनाक्षीताई एकरे .जयश्री ताकसांडे, अर्चना वांढरे, पापय्या पोनमवार, सचिन भोयर, शहराध्यक्ष संतोष महाडोळे, सागर ठाकूरवार, सर्वरभाई, महिला अध्यक्षा माधुरी पिंपळकर, रुपेश चुदरी, प्रा. आशिष देरकर, यु. काँ. तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे, रोहित शिंगाडे, प्रितम सातपुते, उपविभागीय अभियंता आकाश बाजारे, मुख्यधिकरी विशाखा शेरखी, संदीप शुध्देवाड यासह गडचांदूर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *