मनोहरशेठ भोईर यांनी करून दाखविल… नविन शेवा गावात श्रीराम मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रम उत्साहात संपन्न.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 28 उरण तालुक्यातील नविन शेवा गावात शनिवार दि 25 मार्च 2023 ते सोमवार दि 27 मार्च 2023 दरम्यान परमपूज्य श्री अध्भुतानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणेशपूजन, पुण्य हवन मातृकापूजन, नांदी श्राद्ध,देवतास्थापन नवग्रह मंडळ, जलाधिवास ग्रह यज्ञ,वास्तु मंडळ हवन, मूर्ती प्राण प्रतिष्ठापणा, कलशारोहण, रुद्राभिषेक,आरती आदि धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. साडेतीन दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह सुद्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सोमवार दि 27 मार्च 2023 रोजी नविन शेवा गावातील श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार व मुर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी उरणचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी श्रीराम मंदिरात जाऊन श्री रामप्रभूंचे दर्शन घेतले. यावेळी मनोहरशेठ भोईर म्हणाले की श्री प्रभु रामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी मी अयोध्येल गेलो होतो तेव्हा काही लोक म्हणाले की तुम्ही जिथे राहता त्या नवीन शेवा गावात अयोध्येला जाण्या अगोदर राम मंदिर बांधा मगच अयोध्येला जा.मात्र त्यांच्या या भाषणाला आज उत्तर मिळाले असून नविन शेवा ग्रामसुधारणा मंडळ, ग्रामस्थ नविन शेवा, ग्रामपंचायत नवीन शेवा यांच्या सहकार्याने गावातील सामाजिक कार्यकर्ते दयालशेठ भोईर यांनी श्रीरामाचे मंदिर बांधून काढले.आज मंदिराचे जीर्णोद्धार व मूर्ती प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम सुद्धा संपन्न झाले. त्यामुळे आम्ही जे बोलतो ते करून दाखवितो.आम्ही करून दाखविले. राम मंदिर बनवून दाखविले.या शब्दात माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी समाधान व्यक्त केले, मंदिर बांधल्याचे मला आनंद मिळाला असून मंदिर बांधण्यासाठी सर्व ग्रामस्थांचे ,ग्रामसुधारणा मंडळाचे, ग्रामपंचायतचे सहकार्य लाभले आहे. ज्यांनी ज्यांनी या मंदिराच्या कामासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत केली त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो या शब्दात मनोहरशेठ भोईर यांनी सर्वांचे आभार मानले.

या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर, ग्रामसुधारणा मंडळ नविन शेवाचे अध्यक्ष कमळाकर पाटील, सल्लागार – जे. पी. म्हात्रे, नारायणशेठ भोईर, चंद्रकांत घरत, पंडीत घरत, मालती भोईर, जगजीवन भोईर, महेंद्र म्हात्रे, शेखर पडते, भारत भोईर, देवराम घरत, भगवान घरत,गणेश म्हात्रे,के एम घरत, एल जी म्हात्रे, शैलेश भोईर, गणेश घरत, दीपक भोईर, दिनेश घरत,तंटामुक्ती अध्यक्ष हेमंत म्हात्रे, पी डी घरत,सरपंच सोनल घरत, उपसरपंच कुंदन भोईर, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य,ग्रामसुधारणा मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *