इन्फंट कॉन्व्हेंटमध्ये ग्रॅज्युएशन सेरेमनि चे थाटात आयोजन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– इन्‍फंट जिजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे प्री प्रायमरी सेक्शन मध्ये युकेजी वर्गाकरिता ग्रॅज्युएशन सेरेमनीचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे संचालक अभिजीत धोटे, मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, मुख्यध्यापक रफिक अन्सारी, वर्ग शिक्षक माधुरी एरकी यासह शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी संस्थेचे संचालक अभिजीत धोटे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील भवितव्यासाठी त्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात एलकेजी विद्यार्थ्यांच्या ग्रॅज्युएशन सेरेमनी डान्स ने करण्यात आली.
कार्यक्रमांमध्ये मुलांना ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन कु. नीतू सिंग यांनी तर आभार प्रदर्शन नीता जक्कनवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *