Home
Home Breaking News पोलिस स्टेशन गडचांदूर येथे शांतता समिती ची सभा संपन्न

पोलिस स्टेशन गडचांदूर येथे शांतता समिती ची सभा संपन्न

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
रामनवमी, हनुमान जयंती, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती,रमजान ईद हे उत्सव शांतपणे साजरे करावे ,कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन पोलिस निरीक्षक रविंद्र शिंदे यांनी पोलिस ठाण्यात 22 मार्च ला आयोजित करण्यात आलेल्या शांतता समिती च्या सभेत केले,
कोणतेही सण साजरे करताना दुसऱ्या ला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन ला सहकारी करावे असेही आवाहन करण्यात आले,
शहरातील सी सी टी व्ही कॅमेरे, वाहतूक व्यवस्था ,व इतर मुद्यावर सुद्धा यावेळी चर्चा करण्यात आली,
या सभेला शांतता समिती चे सदस्य,शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते,कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार उपस्थित होते,
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here