Home
Home Breaking News आदर्श विद्यामंदिर ,गडचांदूर येथे विज्ञान प्रदर्शनी चे आयोजन

आदर्श विद्यामंदिर ,गडचांदूर येथे विज्ञान प्रदर्शनी चे आयोजन

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून आदर्श प्राथमिक विद्या मंदिर,गडचांदूर येथे शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले होते, विज्ञान प्रदर्शनी चे उद्घाटन अल्ट्रा टेक सिमेंट कंपनी चे युनिट हेड अतुल कंसल यांच्या हस्ते करण्यात आले, प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी रुपेश कांबळे होते त्यांनी आपल्या भाषणात विज्ञानाचा उपयोग समाजाच्या व देशाच्या विकासासाठी करा असे सांगितले,
विज्ञान प्रदार्शनीत प्रथम क्रमांक अर्जुन आरी याने तयार केलेल्या पवनचक्की या मॉडेल ला मिळाला,द्वितीय क्रमांक संजना शाह व संजना केवट यांना मिळाला,तृतीय क्रमांक राहुल गोस्वामी, चतुर्थ क्रमांक पिंकी निषाद व शिवरी केवट यांना तर पाचवा क्रमांक आराधना केवट हिने पटकावला,
उपस्थित मान्यवर अतिथी च्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले ,कार्यक्रमात अल्ट्रा टेक चे एच आर हेड नविन कौशिक,राजीव रंजन,मुख्याध्यापिका डॉ मंजुषा मत्ते,व वैशाली हरकंडे, शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते,
कार्यक्रमाचे संचालन पुरुषोत्तम निब्रड यांनी केले तर आभार प्रदर्शन पुरुषोत्तम बोरकर यांनी केले,
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here