Home
Home वाशिम डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आयोजनाकरिता बैठक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आयोजनाकरिता बैठक

by : Ajay Gayakwad

वाशिम

मालेगाव शहरातील अशोक नगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्त बौद्ध बांधवांची बैठक घेण्यात आली.  14 एप्रिल रोजी  होणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्त अशोकनगर येथे मालेगाव शहरातील संपूर्ण बौद्ध बांधव एकत्र येऊन येथे आगामी जयंती निमित्त सर्वानुमते कार्यक्रम विषय चर्चा करण्यात आली. यामध्ये समाज बांधवांनी शांततेच्या स्वरूपात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंतीला कुठलेही गालबोट लागू नये सर्व समाज बांधवांनी एकत्र यावे सर्वांनी या जयंतीनिमित्त सहकार्य करावे. या महत्त्वाच्या बैठकीमध्ये मालेगाव शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती महिला युवक यांचे उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here