थकबाकी भरणाऱ्या कृषी ग्राहकाचा मुख्य अभियंता च्या हस्ते शेतीच्या बांधावर सत्कार

,,,,,,,,,,,,,,,,,,

लोकदर्शन गडचांदूर👉 प्रा. अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,
महाराष्ट्र राज्य विद्दुत वितरण कंपनी चंद्रपूर चे परिमंडळ अधिकारी सुनील देशपांडे यांच्या आवाहन ला प्रतिसाद देत गडचांदूर येथील प्रतिष्ठित नागरिक कृषी ग्राहक दीपक महाराज पुरी यांचे पुत्र उद्धव पुरी यांनी त्यांच्याकडे असलेले कृषी पंप चे थकबाकी बिल 97हजार 850 रुपये एकरकमी भरल्याबद्दल महावितरण चे मुख्य अभियंता देशपांडे यांनी स्वतः शेतात जाऊन उद्धव पुरी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला,याप्रसंगी उपविभागीय अभियंता अतुल इंदूरकर ,उपव्यवस्थापक प्रदीप जिंदे,उपस्थित होते, शेतकऱ्यांनी 31 मार्च पूर्वी थकीत कृषी पंप चे बिल भरावे असे आवाहन मुख्य अभियंता यांनी केले आहेत,
श्री पुरी यांच्याकडे असलेल्या थकबाकी पैकी 24,550 रुपये यापूर्वी भरले होते,31 मार्च पर्यंत असलेल्य विजबिलात 30 टक्के लाभ मिळाला,त्यांना 55 000 रुपये चा लाभ मिळाला,इतर शेतकऱ्यांनी सुध्दा 30 टक्के विजबिलात माफ़ी चा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य अभियंता यांनी केले आहे,
महावितरण ने कृषी ग्राहकांची काळजी घेत राज्य भरात डिसेंबर महिन्यात 17,785 जानेवारी महिन्यात 8,404 व 8 फेब्रुवारी पर्यंत 2241 असे एकूण 28हजार पेक्षा जास्त नादुरुस्त रोहित्र केवळ 2 ते 3 दिवसात बदलले,चंद्रपूर परिमंडळ मध्ये 500 च्य जवळपास रोहित्र बदलले आहे,परंतु थकबाकी चा डोंगर वाढत असल्याने बडे अधिकारी शेतकऱ्यांच्या अंगणात वसुली करिता जात आहे,चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील घरगुती,वाणिज्यिक, औद्योगिक,सरकारी कार्यालये,सार्वजनिक पाणी पुरवठा योजना,पथदिवे,यांची थकबाकी 242 कोटी 90 लाख रुपयाच्या घरात पोहचली आहे,कृषी ग्राहकांनी थकबाकी न भरल्यामुळे 81 हजार पेक्षा जास्त कृषी पंप ची थकबाकी 250 कोटी76 लाख रुपयांपर्यंत पोहचली आहे,गेल्या10 वर्षांपासून 16532 कृषी ग्राहकांनी 88 कोटी 70 लाख रुपये भरले नाही,अशी एकंदरीत 493 कोटी रुपयांची थकबाकी चा डोंगर निर्माण झाला आहे,असे अभियंत्यांनी सांगितले,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *