जीवती तालुका वनक्षेत्रातून वगळण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविणार: सुधीर मुनगंटीवार*

 

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

नागपूर, दि. 21 डिसेंबर 2022:

जीवती तालुका वनक्षेत्रातून वगळण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्याचा निर्णय आज वनमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. तालुक्यातील 11 गावातील 8195 हेक्टर जमिन वनखंडात समाविष्ट नसून ती जमिन वनक्षेत्रातून बाहेर असल्याची घोषणाही लवकरच करण्यात येणार आहे.

हरिसिंग वनसभागृहात यासंदर्भात झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगाेपालजी रेड्डी, प्रधान मुख्य वनबल प्रमुख वायएलपी राव जी, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी जी बिद्री, चंद्रपूर जिल्हाधिकारी विनयजी गौडा, भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे, माजी आमदार संजयजी धोटे, माजी आमदार सुदर्शनजी निमकर, केशवजी गिरमाजी, महेशजी देवकते यांच्यासह चंद्रपूर जिल्हा आणि जीवती तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

केंद्र सरकारकडे असा विनंती अर्ज करण्यासाठी सर्व प्रशासकीय तयारी गतीने पूर्ण करण्याचे निर्देश या बैठकीत ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तालुक्याचे उपग्रह सर्वेक्षण मॅपिंग करून घेण्याचे आणि ती अद्यावत माहिती पुढील नियोजनासाठी उपयोगात आणावी असेही निर्देश श्री मुनगंटीवार यांनी दिले. ही सर्व कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *