



लोकदर्शन 👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील आवारपूर सिमेंट वर्क्स, अल्ट्राटेक सिमेंट लि.च्या नोकारी लाइमस्टोन माईन्सला प्रतिष्ठित मायनिंग इनोव्हेशन पुरस्कार 2021-22 ने सन्मानित करण्यात आले आहे. एफ आय एम आय (फेडरेशन ऑफ इंडियन मिनरल इंडस्ट्री) ही भारतीय खाण क्षेत्राची सर्वोच्च संस्था आहे आणि खाण शोध, आरोग्य या अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्कारांचे प्रायोजकत्व करते.
शून्य कचरा खाणकाम, खाणकामातील डिजिटलायझेशन आणि पर्यावरण संरक्षण याद्वारे खनिज संवर्धनासाठी केलेल्या प्रशंसनीय प्रयत्नांसाठी वर्षभरासाठी नोकारी चुनखडी खाणींना विशेष खाण अविष्कार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. संपूर्ण भारतात या श्रेणीतील हा एकमेव पुरस्कार आहे.
FIMI हाऊस, नवी दिल्ली येथे 02 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या पुरस्कार सोहळ्यात श्री. आलोक टंडन, सचिव, खाण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने नोकारी लाइमस्टोन माईन्स, आवारपूर सिमेंट वर्क्स चे युनिट हेड श्री श्रीराम पी.एस. आणि माईन्स हेड श्री सौदीप घोष याना पुरस्कार प्रदान करण्यात आला.