ग्रामीण भागातील समस्या कडे पुढाऱ्यांचे दुर्लक्ष. ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ग्रामपंचायत निवडणूक राजकीय वातावरण तापू लागले

लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
नांदा
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

कोरपणा या तालुक्यातील सर्वात मोठी, श्रीमंत व विवीध कारणामुळे प्रचलित असणारी ग्रामपंचायत म्हणून नांदा ग्रामपंचायतची ओळख आहे येत्या 13 ऑक्टोबरला नांदा ग्रामपंचायतची निवडणूक होऊ घातली आहे. निवडणुकीचा रंग चढत असला तरी समस्याचा डोंगर मात्र कायम आहे.

सिमेंट उद्योगाने भरभराटीस आलेल्या या गावाची व्याप्ती वाढतच चालली आहे. अंदाजे जवळपास २०,००० लोकसंख्या असलेल्या ह्या गावात ९३७८ मतदार आहेत. उद्योगाने भरभराटीस आणले तरी समस्या मात्र कायम आहे.

औद्यागिक नागरी म्हणून प्रसिद्धीस येत असलेल्या या गावातील मुख्य रस्त्यावर व चौकात मोठ्या प्रमाणावर नागरिकानी अतिक्रमण केले आहे. यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. या मार्गावर जड वाहतुकीची २४ तास रेलचेल असल्याने व रस्त्यावरील अतिक्रमनाने वाहतुकीची कोंडी होत असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन मार्ग काढावा लागतो. प्रमुख समस्या असली तरी राजकीय हेकेखोरी मुळे जटिल होत चालली आहे.

नांदा गावा अंतर्गत १५ अंगणवाड्या आहेत. त्यांपैकी ७ अंगणवाड्या सुस्थितीत आहे. ५ अंगणवाड्या भाड्याचा खोलीत, २ अंगणवाड्या जिल्हा परिषद शाळेत, तर १ समाज भवनात भरत आहेत. चिमुकल्याचा शिक्षणाचा पाया ठरत असलेल्या या भिंतीला भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले आहे. करोडो चा निधी मिळत असला तरी चिमुकल्याचा शिक्षणाचा स्त्रोत असलेल्या अंगणवाड्या कडे राजकीय मतभेदा मुळे या समस्ये कडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास येत आहे.

स्वच्छ भारत, सुंदर भारत, एक पाऊल स्वच्छतेकडे असा सरकारने नारा दिला असला तरी नांदा मध्ये मात्र स्वच्छतेचे तीन तेरा वाजलेले दिसून येत आहे. नांदा मध्ये जाणारा मुख्य रस्ता, आवाळपूर मार्ग, पिंपळगांव मार्ग, नांदा फाटा येथील चौका, चौकात कचरा दिसून येतो. एवढेच नाहीतर कचरा कुंड्या ओव्हर फ्लो झालेल्या दिसत असतांना देखील या प्रमुख समस्ये कडे कानाडोळा केला जातोय.

कागदी घोडे नाचवत गाव हागणदारी मुक्त असला तरी मागील पंचवार्षिक मध्ये अंदाजे जवळपास २६० शौचालय बांधकाम करण्यात आले. तरी देखील गाव हागणदारी युक्त मार्ग दिसून येत आहे. हागणदारी मुक्तीचा नुसता उवापोह केल्याचे दिसून येत आहे.

अनेक तरुण सैनिक, पोलीस भरती पूर्व तयारी करीत आहे. परंतू जागा असून देखील त्यांना तयारी करण्या करीत मैदानाची व्यवस्था नसल्याने अनेक तरुणांना तयारीला मुकावे लागत आहे तर काही शहर गाठत आहे. अनेकदा निवेदन देवून देखील राजकीय पुढारी युवकांचा मागणीला बगल देत आहे.

अमलनाला येथील नैसर्गीक प्रवाह असलेला नाला हा नांदा येथून वाहतो. पावसाळ्यात सतत दोन महिने तुडुंब भरून वाहत असल्याने शेतकऱ्याची कामे प्रभावित होत असल्याने अतोनात नुकसान होत आहे. अनेक मोठ्या नेत्यांनी आश्वासने दिली तर गावपातळीवरील नेत्यांनी मतदार आपल्या बाजूने खेचण्या करिता उठाठेव केला परंतू निधी किंवा सबळ आश्वासन मिळतं नसल्याने शेतकऱ्यानंमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

राजकीय नेते मंडळी विकासाचा बाहू करीत असला समस्यामुळे कार्यशैली वर नागरीक प्रश्न चिन्ह निर्माण करीत आहे. समस्या लक्षात घेता नेते मंडळी विकासात्मक कोणते मुद्दे घेऊन मतदारांना प्रभावित करतील व ते कसे प्रतिसाद देतील हे देखील बघण्या जोगे असतील.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *