आयुष्यात माझ्या…2022 सालचा… लेखाजोखा…. सिध्दार्थ कुलकर्णी मराठी साहित्य मंडळ विदर्भ विभाग प्रदेश अध्यक्ष

आयुष्यात माझ्या…2022 सालचा… लेखाजोखा….

सिध्दार्थ कुलकर्णी
मराठी साहित्य मंडळ
विदर्भ विभाग प्रदेश अध्यक्ष

लोकदर्शन पुणे ;👉 राहुल खरात

2022 हे वर्ष माझ्यासाठी खऱ्या अर्थाने संमिश्र असेच म्हणावे लागेल… सुरवातच एका जवळच्या व्यक्तीने दिलेल्या धक्याने झाली… हा एक अपवाद वगळता बाकी खूप आशादायक उत्साही झाली… समाजातील साहित्याशी, राजकारणाशी, आणि समाजकारणाशी संबंधित एकापेक्षा एक दिग्गज व्यक्तींशी, व्यक्तिमत्त्वाशी संपर्क झाला जसे की श्री.बसवराज पाटील , श्री.संजय बनसोडे, श्री दिनेश सास्तुरकर ,श्री.जेवळेकर,ज्यांच्यामुळे मला उदगीर येथील साहित्य संमेलनात विशेष स्थान मिळाले… आणि राज्य, केंद्रिय मंत्री , साहित्यीक , तसेच उदगीर, लातूर येथील कित्येक उच्च पदस्थ सरकारी अधिकारी , पोलिस अधिकारी यांच्याशी परिचय झाला..

२)… डॉ.श्री.जयप्रकाश घुमटकर कवी गोलघुमट ज्यांनी माझ्यातील क्षमता ओळखून मला मराठी साहित्य मंडळ विदर्भ विभाग प्रदेश अध्यक्ष म्हणून नियुक्त केले…. आणि साहित्यात क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावण्याची प्रथम संधी दिली… हे विशेष होय. आणि यांची भेट ज्यांच्यामुळे झाली आणि माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली ते डॉ विलास कुळकर्णी आणि श्री सुधीर शेरे साकव्य विकास मंच मित्र हे होय..

३)… श्री. गजानन जोशी ,श्री. राजू वाघ, श्री. कलाम खान यांच्यामुळे नागपूर मधे दोन कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. याचं दरम्यान श्री. माशेलकर , सौ.सरोज चौधरी श्री. राम चव्हाण, श्री.मनीष उपाध्याय, श्री. अनिल इंगवले , श्री. प्रसाद वगळ यांच्या सारख्या महान उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तींशी संपर्क झाला. आणि मला मोलाची मदत करणाऱ्या सौ. ज्योत्स्ना ताई साने कुरहेकर आणि भक्तिताई जाधव .

४)… सौ.जयश्री श्रीखंडे यांच्यामुळे .. बकुळग्रंथ या शांता शेळके यांच्या कार्यक्रमात… श्री. श्रीपाल सबनीस , श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले, पद्मश्री. गिरीश प्रभुणे, डॉ. पी. डी. पाटील, डॉ. राजा दिक्षित, श्री. रामदास फुटाणे , श्री.अशोक पत्की, श्री. प्रमोद पाटील , प्रा. मिलिंद जोशी, श्री. भारत सासणे आणि विशेष म्हणजे श्री. राजन लाखे… ज्यांच्यामुळे डॉक्टरांचे विशेष कवी संमेलन मला अनुभवता आले.

५)… सौ. मेघना साने यांच्यामुळे रेडिओ विश्वास, वर ऑडियो आणि प्रभाते मनी वर व्हिडिओ मुलाखत झाली तसेच सौ. निता तूपारे यांच्यामुळे FTII या प्रसिद्ध संस्थेच्या रेडिओ FM वर मुलाखत झाली

६)…. पत्रकार परिषदेदरम्यान काही पत्रकार मित्रांशी परिचय झाला जसे की गुलाब राजा फुलमाळी, रवी यादव, सईद सलीम, सौ. अंजली वारकरी, श्री.देवेंद्र भुजबळ आणि डॉ.रवींद्र सोरटे आणि इतर बऱ्याच जणांनी माझ्या कविता,मुलाखत प्रसिद्ध करुन मोलाची मदत तर केलीच पण ज्यांनी वेळोवेळी मला विशेष ओळख प्राप्त करून दिली ते म्हणजे श्री. कलाम खान आणि श्री. राहुल खरात होय.
आणि सुप्रीम कोर्ट प्रसिद्ध वकील श्री. संतोष जाधव….

अशा अनेकांपैकीच एक उत्तुंग महान यशस्वी व्यक्तिमत्व म्हणजे जय महाकाली शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा ” शिक्षण महर्षी पंडीत शंकर प्रसाद अग्निहोत्री “….

२७ नोव्हेंबर २०२२ रोजी वर्धा येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनात विशेष अतिथी म्हणून ( विदर्भ विभाग प्रदेश अध्यक्ष) जाण्याचा योग आला आणि वर्धा मराठी साहित्य मंडळ अध्यक्ष सौ. लता हेडाऊ , सौ.अंजली कांबळे यांच्याशी परिचय झाला विशेष म्हणजे त्यांच्या सर्व महिला सहकार्यांक्या अथक प्रयत्नांनी सम्मेलन यशस्वी झाले आणि जय महाकाली शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा शिक्षण महर्षी पंडीत शंकर प्रसाद अग्निहोत्री यांच्याशी परिचय झाला… पहिल्याच भेटीत इतका आपलेपणा विश्वास मिळाला की क्षणाची ओळख युगायुगाची वाटली… भाषण करायला सुरवात करताच साहित्य आणि भाषेवरील प्रभुत्वाची आणि बोलण्यातील , वागण्यातील त्यांच्या नम्रपणाने.. त्यांच्या विशाल व्यक्तित्वाची ओळख झाली. आणि विशेष म्हणजे ती ओळख तितकीच मर्यादीत न राहता आजतागायत संपर्कात राहिली हे विशेष होय…८ जानेवारी रोजी विदर्भ हिंदी साहित्य संमेलनासाठी निमंत्रण पण आल आणि त्यांचं भाषण ऐकून हिंदीतही ते तितक्याच सहजतेने प्रभुत्व वाजवतात याची खात्री पटली… संमेलनादरम्यान त्यांनी काही पारितोषिक घोषित तर केलीच आणि भविष्यातही त्यांच्या संस्थेचे विशाल सभागृह मंडळाला उपलब्ध करुन देण्याची आश्वासक ग्वाही देत एक मित्रत्वाची , मोठ्या भावाची भूमिका पार पाडली. अशा या प्रभावी व्यक्तिमत्त्वास उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा आणि आमचा हा परिचय वृद्धिंगत होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना

आणखीही काही नावं… श्री.अनिल सातव,श्री प्रकाश जमदाडे, सौ.मानसी गायकर, सौ प्रियाताई नाईक आणि अशा बऱ्याच व्यक्तींशी संपर्क झाला ज्यांची नावं कदाचित अनवधानाने इथे आली नसतील त्यांचेही खूप खूप मनपूर्वक आभार पण पुढल्या लेखाजोख्यात त्यांचा उल्लेख होईलच … त्यांनी कृपया मला मोठ्या मनाने माफ करावे

#यातील एक खेदजनक बाब मी इथे उल्लेखित केली नाही त्याची विशेष दखल नंतर पुढच्या वेळी घेईनच

सिध्दार्थ कुलकर्णी
मराठी साहित्य मंडळ
विदर्भ विभाग प्रदेश अध्यक्ष

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *