ब्युटी क्वीन स्पर्धेत मुलुंडची जसकीरत कौर विर्क ही उपविजेती (प्रथम) ठरली. ,

लोकदर्शन मुंबई – आय आय टी बॉम्बे (पवई- 👉महेश्वर तेटांबे

मुंबई- आयआयटी बॉम्बे आयोजित आशियातील सर्वात मोठ्या ‘मूड इंडिगो’ महोत्सवात दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ब्युटी क्वीन स्पर्धेत देशभरातील जवळजवळ दोनशे तरुणींनी सहभाग घेतला होता.
मुलुंडच्या जसकिरत कौर विर्क हिला आयआयटी बॉम्बे येथील कोन्वोकेशनल सभागृहात झालेल्या अंतिम फेरीत ज्युरींनी ब्युटी पेजंट स्पर्धेत उपविजेते (प्रथम) घोषित केले. चित्रपट अभिनेते करण सिंग छाबरा आणि विनोद नायक (फॅशन कपड्यांमधील सुप्रसिद्ध नावे) यांनी जसकीरत कौर यांना पुरस्कार प्रदान केला.
जसकिरत कौर सध्या मिठीबाई कॉलेजमधून औद्योगिक मानसशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. तिला योगा आणि बॅडमिंटनमध्येही खूप रस असून तिने आतापर्यंत जिल्हा पातळीवर 2 ट्रॉफीज जिंकल्या आहेत. तिच्या या उत्तुंग यशाचे श्रेय आई रणजित कौर आणि वडील दिलबग सिंग यांना जाते. जसकिरत च्या कर्तुत्वामुळे मुंबई महाराष्ट्रांत तिचे कौतुक होत आहे़.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *