वनविभागाच्या अतिक्रमण हटाव मोहीम जाचाला कंटाळून शेतकऱ्याने घेतल विष,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

लोकदर्शन 👉 आबिद अली।

कोरपना 👉कोरपणा येथून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मांडवा येथील 14 शेतकऱ्यांनी सर्वे नंबर 59 व नवीन 114 मध्ये आदिवासी शेतकऱ्यांचे व पंधरा ते वीस आदिवासी शेतकऱ्यांचे अतिक्रमण 1977 पासून जमीन कसून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे यापूर्वी महसूल विभागाने काही शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे दिले व वन कायदा 2005 अस्तित्वात आल्यानंतर जय आदिवासी करिता तीन पिढ्या ची अटी व शर्ती मुळे वन हक्काच्या दावा पासून वंचित राहिले शासनाने यापूर्वी अतिक्रमण तपासण्यासाठी समित्या गठित केल्या होत्या मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील पूर्वीच्या राजुरा व सध्याचे कोरपना जिवती हा भाग हैदराबाद निजाम शासन यांच्या अधिपत्याखाली होता व नंतर काही काळ आदिलाबाद व नांदेड जिल्ह्यामध्ये समावेश असल्याने चंद्रपूर जिल्हा अस्तित्वात आल्यानंतर चंद्रपूर मध्ये हा भाग समाविष्ट झाला मात्र 1960 पूर्वीचे कोणतीही याठिकाणी पुरावे मिळत नाही उपविभागीय वनाधिकारी राजुरा वनपरिक्षेत्र अधिकारी वन सडी व इतर नऊ कर्मचाऱ्यांच्या ताफ्यासह जेसी बी घेऊन मांडवा येथे सर्वे नंबर 114 चे अतिक्रमण हटविण्यासाठी पोहोचले त्या ठिकाणी कापूस तूर पीक व अतिक्रमण काढण्याची कारवाई पूर्वसूचना न देता हटवण्याची मोहीम सुरू केली असता बाळकृष्ण काळे व त्यांची पत्नी पार्वता टाहो करत आमचे कुटुंब उध्वस्त करू नका पिक उध्वस्त करू नका असे ओरडत असतानाच बाळकृष्ण हा मी व माझे कुटुंब उघड्यावर पडणार आहोत असे म्हणत विषारी औषध प्राशन केले जीवन जगण्यापेक्षा जीवन संपवणे बरे म्हणून जेसीबी पुढे पडले कोरपना राजुरा व जिवती या तालुक्यात अनेक गावांमध्ये गेल्या पन्नास-साठ वर्षापासून अतिक्रमण करून हजारो कुटुंब उदार निर्वाह करत जगत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ही कारवाई होत असली तरी अनेक कुटुंब उघड्यावर पडून दहशत जी मध्ये जीवन जगत आहे विष प्राशन सारखा घटना घडू नये केंद्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील निजाम राजवटीत क्षेत्रात अट शिथिल करून न्याय द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आबिद अली यांनी केली आहे रुग्णालयात जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले वन विभागाची ही कारवाई अतिक्रमण धारकांच्या जिवावर बेतत असून वनकर्मचारी व अतिक्रमण धारकांचा संघर्ष टाळण्या साठी लोकप्रतिनिधी व शासनाने जुलमी कारवाई थांबवावी अन्यथा शेतकऱ्यांना आंदोलनाचा पर्याय स्वीकारण्याची पाळी येईल असा इशारा दिला आहे बाळकृष्ण काळे यांच्या पत्नीने कोरपना पोलिसात वन विभागाच्या दबंग कारवाईमुळे माझ्या पतीचा व कुटुंबाचा जीव टांगणीला आल्याची तक्रार पोलिसात केली आहे यामुळे या क्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झालेली असल्याचे निवेदनात म्हटले आहे

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *