इन्फंट कॉन्व्हेंट येथे चार दिवसीय क्रीडा स्पर्धा उत्साहात.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट् जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल येथे चार दिवसीय क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी खेळ प्रतिज्ञा घेऊन संघ भावना कायम ठेवली. ध्वजारोहण करून मशाल पेटवून विविध क्रीडा स्पर्धांना सुरूवात करण्यात आली. यात शंभर मीटर रनिंग, चारशे मिटर रनिंग, व्हाॅलीबाल, थ्रोबाॅल, क्रिकेट, रस्साखेच यासह विविध क्रीडा प्रकार घेण्यात आले. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन अनेक विद्यार्थ्यांनी यशसंपादन केले.
विविध क्रीडा प्रकारात मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, सचिव माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, संचालक अभिजित धोटे, मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, क्रीडा शिक्षक, यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्गाने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *