



लोकदर्शन पुणे 👉राहुल खरात
मंगळवार दि. २२ नोव्हेंबर २०२२ रोजी पं कल्याणजी गायकवाड संगीत प्रतिष्ठान आळंदी यांच्या वतीने संत ज्ञानोबारायांच्या संजीवन सोहळ्याचे औचित्य श्रीक्षेत्र आळंदी येथील सिद्धबेटावर दिपोत्सोवाचे आयोजन करण्यात आले होते. पं कल्याणजी गायकवाड, महागायिका कार्तिकी गायकवाड, कौस्तुभ गायकवाड यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे उद्योजक सागर शिंदे, राजगुरुनगर सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित संचालिका अश्विनी पाचारणे, रांगोळीकार राजश्री भागवत, वृक्षमित्र वैष्णवी पाटील, पत्रकार स्नेहा मडावी यांचा सत्कार करण्यात आला तसेच वजीर, वानरलिंगी, संडे पिनॅकल सुळके, लिंगाणा, भैरवगड, अलंग मलंग, ढाक बहिरी, हरिहर असे अवघड किल्ले सर करणा-या अभिनव अजित आरूडे, आदित्य अशोक कोरडे व आर्यश अशोक कोरडे या लहान मुलांना पं कल्याणजी गायकवाड प्रतिष्ठानच्या वतीने “साहसवीर” हा पुरस्कार देवून महागायिका कार्तिकी गायकवाड, पिसे यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले, या कार्यक्रमानंतर उपस्थित नागरिकांनी हजारो दीप प्रज्वलित केले, त्याने सिद्धबेटाचा संपूर्ण परिसर उजळून निघाला. या कार्यक्रमासाठी ई टी व्ही मराठी सूर गृहलक्ष्मीच्या विजेत्या गायिका ज्योती गोराणे, ह.भ.प पांडुरंग महाराज कदम, भागवताचार्य जगदीश महाराज शास्त्री, छोटे उस्ताद सोहम गोराणे, तबला वादक शाम गोराणे, उद्योजक रोनित पिसे, माऊली दास महाराज, शिवाजी महाराज वटंबे, रघुनंदन महाराज पुजारी, सुरेश महाराज काचकुंडे, उदयोगपती किरण मारणे, साहेबराव कवडेकर, अमोल नवपुते, हरि गवारे, अजित आरूडे, गुंडाजी जीवना, अशोक कोरडे, पत्रकार सुनिल भोसले हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका, अभिनेत्री पूजा थिगळे यांनी केले होते. या कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप राक्षे, आदिनाथजी सटले, राजेश टाकळकर, मारूती तायनाथ, रामदास ठोंबरे, संतोष साळुंके, संकेत राक्षे, कैवल्य गायकवाड, रितेश राक्षे यांनी केले होते, कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्राची महागायिका कार्तिकी गायकवाड व कौस्तुभ गायकवाड यांनी गायलेल्या पसायदानाने करण्यात आली