जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचा राहुल गांधींबरोबर संवाद. राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेत रायगड कॉंग्रेसचा डंका

 

लोकदर्शन👉.विठ्ठल ममताबादे

उरण दि १८ नोव्हेंबर 2022राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला सर्वत्र प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत असून राष्ट्रीय कॉंग्रेस नेते राहुलजी गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्र राज्यात नांदेड येथे दाखल झाल्यापासून रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत हे त्यांच्या शेकडो पदाधिकाऱ्यांसह भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. दि. १७ नोव्हेंबर रोजी वाडेगाव ता. अकोला येथे महेंद्र घरत यांना राहुल गांधी यांच्या सोबत ७ मिनिटे संवाद साधण्याची संधी मिळाली. यावेळी प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोलेही सोबत होते. स्व. बॅ. अंतुले साहेबांच्या रायगड जिल्ह्याची जबाबदारी महेंद्र घरत यांच्यावर दिली आहे असे नानाभाऊ पटोलेंनी राहुलजी गांधी यांना सांगितले. तसेच महेंद्र घरत यांनी रायगड कॉंग्रेसला नवसंजीवनी दिल्याचे नानाभाऊ पटोलेंनी राहुलजींना सांगितले.
रायगड जिल्हा कॉंग्रेस तर्फे वाडेगाव ता. अकोला येथे दि. १७ नोव्हेंबर रोजी पदयात्रेच्या मार्गावर कोळी नृत्याचे सादरीकर करण्यात आले. राहुल गांधी यांनी याची दखल घेत कलाकारांना स्वतः हात करून जवळ बोलावून घेतले. यावेळी रायगड कॉंग्रेस तर्फे कोळी समाजाचे प्रतिक मच्छीमार बोट राहुलजींना भेट देण्यात आली. राहुलजींनी त्याचा सन्मानपूर्वक स्वीकार केला. रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांच्यासोबत जिल्ह्यातील दोनशे कार्यकर्ते व कोळी नृत्याने पदयात्रा दणाणून सोडली. पदयात्रेत त्या दिवशी रायगड जिल्ह्याचाच बोलबाला होता. जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या अकोला येथील पदयात्रेच्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here