अन्नुर अंतरगाव येथे पुल बांधकामाचे भूमिपूजन. ♦️आमदार सुभाष धोटेंच्या प्रयत्नाने १ कोटी ७९ लक्ष निधी मंजुर.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने मंजूर सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ चंद्रपूर नाबार्ड-२७ कार्यक्रमांतर्गत राजुरा तालुक्यातील चनाखा – विहीरगाव – अन्नुर अंतरगाव रस्ता कि.मी. ३८/६३० मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे अंदाजे किंमत १ कोटी ७९ लक्ष रुपयाच्या विकासकामाचे भूमिपूजन सरपंच भास्कर कन्नाके यांच्या हस्ते करण्यात आले. तर पुलाच्या बांधकामासाठी निधी मंजूर करून दिल्याबद्दल गावकर्‍यांनी आ. धोटे यांचे आभार मानले आहेत.
या प्रसंगी सरपंच भास्कर कन्नाके, उपसरपंच शितल उपासे, ग्रा. प. सदस्य सुरेखा सलामे, दशरथ कन्नाके, अंबादास भोयर, शंकर पालीकोंडावार, जितेंद्र उपासे, प्रकाश चौधरी, राजू घोडेकार, विठोबा लोणारे, किशोर भोयर, जगदीश सिडाम, चेतन चौधरी, गोविंदा मेश्राम, गणेश नागापुरे, परशुराम वेट्टी यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here