जासई विद्यालयात शोकसभेचे आयोजन

 

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 12 नोव्हेंबर2022 रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनियर कॉलेज दहागाव विभाग जासई, तालुका उरण जिल्हा रायगड या विद्यालयाचे व्हाईस चेअरमन ,जासई गावचे ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी कै. रामभाऊ सखाराम घरत यांचे वयाच्या 85 व्या वर्षी दुःखद निधन झाले .त्यांच्या या दुःखद निधनाबद्दल आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी विद्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. शाळा व्यवस्थापन व विकास समिती चे अध्यक्ष,कामगार नेते सुरेश पाटील यांनी तात्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या समाजसेवा आणि दानशूर व्यक्ती मत्वाची आठवण करून दिली आणि कमिटीच्या वतीने आदरांजली वाहिली.विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण घाग यांनी व्हाईस चेअरमन कै. रामभाऊ सखाराम घरत यांच्या कारकीर्दीत त्यांनी या विद्यालयाच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांना शाळेतर्फे आदरांजली वाहिली. शाळा व्यवस्थापन समिती चे सदस्य डी. आर. ठाकूर,प्रभाकर मुंबईकर,विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक नुरा शेख यांनी तात्यांना आदरांजली वाहिली. या शोक सभेला चेअरमन अरुण जगे,नरेश घरत,यशवंत घरत,गणेश पाटील, हिराजी पाटील आणि विद्यालयातील सर्व सेवक विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here